Next
पुण्यात व्हर्लपूलचे सर्वांत मोठे ‘हौटे-किचन’
प्रेस रिलीज
Monday, March 12 | 06:14 PM
15 0 0
Share this story

पुणे :  व्हर्लपूल या अग्रगण्य होम अप्लायन्स ब्रँडने महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशनच्या  (एमईसी) सहकार्याने देशातील सर्वांत मोठे बिल्ट-इन-अप्लायन्सेस एक्सपिरीएंटल सेंटर पुण्यात सुरू केले आहे.  दोराबजी हेरीटेज मॉल येथे रविवारी, ११ मार्च रोजी  या खास  ‘व्हर्लपूल हौटे-किचन’चा शुभारंभ झाला. या वेळी  सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर, नामांकीत आर्किटेक्ट अमला सेठ, एमईसीचे मालक अमर छाब्रा तसेच इंटीरियर आणि आर्किटेक्ट क्षेत्रातील इतर मान्यवर उपस्थित होते. नऊ शहरांमध्ये विशेष बिल्ट-इन अप्लायन्स शोरूम सादर केल्यानंतर या ब्रँडने विस्तारीकरणाच्या दिशेने आणखी एक पाऊल उचलले आहे. 

या वेळी शेफ कुणाल कपूर यांनी उपस्थितांना उपकरणांचे प्रात्यक्षिक दाखवले. या दालनात  सर्वोत्तम युरोपियन स्टाईलिंग आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत व्हर्लपूल बिल्ट-इन अप्लायन्सेसची संपूर्ण श्रेणी उपलब्ध  आहे. त्यात हुड्स, हॉब्ज, कॉफी मशीन, ओवन, मायक्रोव्हेव ओवन, रेफ्रिजरेटर, वाईनकुलर्स, वॉटरप्युरीफायर्स, स्टीम ओवन, डिशवॉशर आणि स्टकेबल वॉशर, ड्रायर्सचा समावेश आहे. याठिकाणी लोकांना सर्व बिल्ट-इन-अप्लायन्सेसचा, तसेच ‘हौटे-किचन’ मधील लाईव कुकिंग एक्सपीरियन्स घेता येईल. कोणालाही उपकरणाच्या प्रात्यक्षिकासाठी नोंदणी करता येईल. त्यानंतर व्हर्लपूलकडून शेफ पाठविण्यात येईल. जो तुमच्यासाठी चवदार पदार्थ तयार करेल. 
 
याबाबत अधिक माहिती देताना व्हर्लपूल ऑफ इंडियाचे बिझनेस हेड ए. नटराजन  म्हणाले, ‘भारतात बिल्ट-इन-अप्लायन्सेसकरिता पुणे कायमच एक महत्त्वाची बाजारपेठ होती. त्यामुळे त्यांनी चाहत्यांसाठी काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न केला. आधुनिक वापरकर्त्यांच्या नवीन गरजा ओळखून आम्ही आमच्या पहिल्या आणि सर्वात मोठ्या बिल्ट-इन-अप्लायन्सेस सेंटरसह पुण्यात प्रवेश करताना अतिशय उत्साही आहोत. भारतात बिल्ट-इन-अप्लायन्सेसची मागणी वाढत असून एक विशेष स्टँड अलोन स्टोअर असणे आमच्याकरिता गरजेचे होते. ज्याठिकाणी ग्राहक येऊन आमच्या सर्व प्रकारच्या उपकरणांचा स्वत: अनुभव घेऊ शकणार आहेत. या शहरातील आमचे ग्राहक आता स्वत:चे किचन अत्याधुनिक आणि प्रगत सुविधांनी सजवतील. व्हर्लपूलची सर्व बिल्ट-इन-अप्लायन्सेस सहा  सेन्स टेक्नोलॉजीने युक्त आहेत.’
 
सेलेब्रिटी शेफ कुणाल कपूर म्हणाले, ‘व्हर्लपूलची श्रेणी केवळ उच्च सादरीकरण करत नसून स्मार्ट आणि विश्वासार्ह डिझाईनने युक्त आहे. या उत्पादनांमुळे जेवण बनविणे सोपे,जलद आणि आरोग्यदायी होते. व्हर्लपूल हा कायमच माझा पसंतीचा ब्रँड आहे. आपण स्वयंपाकघरातील उपकरणांविषयी बोलतो, जेव्हा एखाद्याला स्वयंपाकघराचा कायापालट करायचा आहे किंवा स्टाईल बदलायची आहे, तेव्हा मी प्रत्येकाला याची शिफारस करेन. व्हर्लपूलने पुण्यात सर्वात मोठे बिल्ट-इन-अप्लायन्सेस स्टोअर सुरू केल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. ही उपकरणे विविधांगी आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने प्रगत आहेत. या उपकरणांच्या साथीने जेवण बनविताना एक दर्जा राखला जातो. व्हर्लपूलची बिल्ट-इन-अप्लायन्सेस छान आणि सोप्या रचनांची आहेत. त्यामुळे जेवण बनविताना आनंद मिळतो.’ 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link