Next
हाउसिंग सोसायट्यांसाठी ‘ऑल इज वेल अॅप’
प्रेस रिलीज
Thursday, February 01 | 02:35 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘ओपन सी इनोव्हेशन लॅब्ज’ने एकाच मंचावरून निवासी सोसायट्या, कार्यालये, शाळा, कॉलेजे आणि कारखान्यांसाठी सुरक्षेची स्मार्ट उपाययोजना पुरविणारे ‘ऑल इज वेल अॅप’ सुरू होत असल्याची घोषणा केली. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणारे, नवतंत्रज्ञानाने सज्ज अशा या अॅपची रचना आणि निर्मिती सुरक्षा उपाययोजनांच्या माध्यमातून स्मार्ट आणि सुरक्षित आयुष्य जगण्याच्या दृष्टीने करण्यात आली आहे.

हे अॅप सुरक्षेच्या सर्व तऱ्हेच्या समस्यांवर पूर्णपणे डिजिटाइज्ड पद्धतीने उपाय पुरविणारे आहे. साइनिंग-इनसाठी केवळ ३० सेकंदांचा वेळ पुरविणारे हे अॅप सुरक्षा यंत्रणा अधिक कार्यक्षम बनविण्यावर तसेच सुरक्षा रक्षक आणि एखाद्या इमारतीस नियमितपणे भेट देणाऱ्या आगंतुकांची मानहानी टाळत सुरक्षा जपण्यावर लक्ष केंद्रित करते.

सुरक्षेसाठी पारंपरिकरित्या वापरण्यात येणाऱ्या पद्धतींमध्ये असलेल्या त्रुटींचा सखोल अभ्यास आणि संशोधन करून ‘ऑल इज वेल’ अॅप तयार करण्यात आले आहे. राहत्या परिसरासाठी सर्वांगिण सुरक्षेची परिपूर्ण यंत्रणा या स्वरूपात विकसित झालेले हे अॅप निवासी सोसायट्यांसाठी जितके उपयुक्त आहे तितकेच ते एखाद्या कार्यालयाच्या स्वागतकक्षाचे व्यवस्थापन करण्यासाठी किंवा एखाद्या कारखान्याच्या सुरक्षेचे संपूर्ण व्यवस्थापन करण्यासाठीही उपयुक्त आहे. एखाद्या इमारतीस भेट देणाऱ्यास आगंतुकांची ओळख हे अॅप त्यांच्या मोबाइल नंबरवरून पटवून घेते. त्यांची माहिती मोबाइल्समध्ये नोंदवून ठेवते आणि अॅप नोटीफिकेशन, ओटीपी, आयव्हीआर कॉल्सद्वारे आगंतुकांना प्रवेश खुला करून देते.

‘ऑल इज वेल’ अॅपचे सह-संस्थापक आणि सीईओ कुणाल महेश्वरी म्हणाले, ‘ऑल इज वेल अॅपची रचना सर्व प्रकारच्या उद्योगक्षेत्रांच्या सुरक्षा आणि ठिकाणांच्या एकूण व्यवस्थापनाच्या खास हेतूने आणि सुटसुटीतपणे वापरण्याजोगी करण्यात आली आहे. या क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर इतर काही कंपन्या आधीच कार्यरत आहेत; पण ‘ऑल इज वेल’प्रमाणे एकाच मंचावरून अनेक ठिकाणच्या सुरक्षा यंत्रणा हाताळण्याइतक्या त्या तांत्रिकदृष्ट्या प्रगत नाहीत. ‘ऑल इज वेल’ सुरक्षेच्या क्षेत्रात नव्याने प्रवेश करत असलेली ही साधी सुटसुटीत उपाययोजना देशातील प्रत्येक व्यक्तीला अधिक सुरक्षित निवासी जागा आणि अधिक सुरक्षित कार्यालयीन ठिकाण मिळेल याची हमी देते.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link