Next
रत्नागिरीत महिला संमेलन उत्साहात
क्षत्रिय मराठा मंडळातर्फे महिला दिनी आयोजन
BOI
Friday, March 15, 2019 | 12:55 PM
15 0 0
Share this story

क्षत्रिय मराठा मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ महिलांशी संवाद साधताना प्राची शिंदे आणि धनश्री पालांडे.

रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त येथील क्षत्रिय मराठा मंडळातर्फे शहरातील अंबर हॉलमध्ये महिला संमेलन आयोजित करण्यात आले होते. यात मराठा समाजातील दोनशेहून अधिक महिला उपस्थित होत्या.

या वेळी प्राची शिंदे व धनश्री पालांडे यांनी ज्येष्ठ महिलांशी हितगूज केले. मुलींनी, महिलांनी संसारात एकमेकांना सांभाळून आपला घरसंसार, करिअर करावे, सामाजिक कार्यात भाग घ्यावा असा सल्ला देतानाच स्त्री ही प्रचंड ऊर्जेचा स्रोत आहे, ती कधीच कुठे कमी पडू शकत नसल्याचा संदेश या जेष्ठ महिलांनी दिला.

संमेलनाला उपस्थित महिला

या संमेलनाच्या निमित्ताने महिलांसाठी नृत्य, काव्य-वाचन, राजस्थानी लोकनृत्य, लावणी, पपेट डान्स आदी मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. यातून महिलांमध्ये दडलेल्या गुणांना चालना मिळाली. श्रद्धा आयरे यांनी नुकत्याच सुरू केलेल्या व्हिनस ब्युटी अँड स्पा सॅलोनच्या माध्यमातून महिलांसाठी विशेष लकी ड्रॉ काढण्यात आला. अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली. अंबर हॉलचे कौस्तुभ सावंत आणि सुहास ठाकुरदेसाई, गौरव सावंत यांचे विशेष सहकार्य लाभले.

मंडळामध्ये कार्यरत असणार्‍या मनोरंजन कमिटीतील मनाली राणे, शीतल खानविलकर, मेघना सावंत, प्रियांका चौगुले, नम्रता कदम, दीप्ती खामकर, राही सावंत, ऋतुजा देसाई, नीलिमा मगदूम, मैथिली जाधव, उल्का चौगुले आणि नंदिता सावंत यांनी संमेलनाचे शिस्तबद्ध नियोजन केले. सूत्रसंचालन कोमल तावडे आणि मैथिली जाधव यांनी केले.

२३ मार्च २०१९ रोजी शिवजयंतीनिमित्त होणार्‍या शोभायात्रेसाठी बहुसंख्य मराठा बंधु-भगिनींनी सायंकाळी ५.३० वाजता जयस्तंभ येथे उपस्थित राहून शोभायात्रेत सहभागी होण्याचे आवाहन क्षत्रिय मराठा मंडळातर्फे या वेळी करण्यात आले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link