Next
मांज्यात अडकलेल्या कबुतराची नागरिकांकडून सुटका
BOI
Monday, February 18, 2019 | 12:27 PM
15 0 0
Share this storyनाशिक : नाशिक-पुणे मार्गावरील बोधलेनगर येथे नायलॉन मांज्यात अडकलेल्या कबुतराची नागरिकांनी वेळीच सुटका केल्याने त्याचे प्राण वाचले.

नाशिक-पुणे रस्त्यावर असणाऱ्या बोधलेनगर येथे सुपर बाईक वॉश समोरील वीजेच्या तारांवर पतंगाचा मांजा होता. त्यात १६ फेब्रुवारी रोजी सकाळी कबूतर अडकले. कबुतराने त्यातून सुटका करून घेण्यासाठी धडपड केल्यामुळे मांजाचा फास त्याच्या पायाभोवती व पंखाभोवती गुरफटला. अखेर कबूतर वरून खाली पडल्यानंतर सलून व्यावसायिक गणेश मिसाळकर यांनी त्याला उचलले. नागरिकांनीही या ठिकाणी धाव घेतली. नागरिकांनी ही माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर संघटक नितीन पंडित यांना दिली. पंडित, आकाश भालेराव, रत्नाकर मोहिते, रूपाली सूर्यवंशी, संतोष  सरोदे आदींनी कात्रीच्या सहाय्याने मांजा कापून कबुतराला मोकळे केले. सुटण्याच्या धडपडीत कबुतराला जखमाही झाल्या. त्यामुळे त्याला उडता येत नव्हते. नागरिकांनी त्याच्यावर औषध उपचार करून पाणी पाजले. थोड्यावेळाने तरतरी आल्यावर कबुतराने आकाशात झेप घेतली.

नायलॉन मांजा न वापरण्यासाठी प्रशासन व सामाजिक संघटना जनजागृती करीत आहेत; मात्र त्याचा काहीही उपयोग झालेला दिसत नाही. बंदी असतानाही नाशिक रोडसह शहरात नायलॉन मांजाची बेकायदा विक्री झाली. पतंगप्रेमींची एक दिवसाची हौस झाली; मात्र त्याचे परिणाम पशु-पक्षांना अजूनही भोगावे लागत असल्याचे या घटनेवरून दिसून आले. महापालिकेने झाडे, तारा व अन्य ठिकाणांवरील मांजा नष्ट करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link