Next
व्यावसायिक नाट्य स्पर्धेत ‘सोयरे सकळ’ प्रथम
प्रेस रिलीज
Thursday, May 30, 2019 | 05:57 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ३१व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत येथील भद्रकाली प्रॉडक्शन संस्थेच्या ‘सोयरे सकळ’ या नाटकासाठी सात लाख ५० हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक जाहीर झाले. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही घोषणा केली आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित या स्पर्धेच्या अंतिम फेरीचे निकाल असा : जिगिषा आणि अष्टविनायक, मुंबई या संस्थेच्या ‘हॅम्लेट’ या नाटकास चार लाख ५० हजारांचे द्वितीय, तर अद्वैत थिएटर्स, मुंबई या संस्थेच्या ‘आरण्यक’ या नाटकाला तीन लाखांचे तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. 

दिग्दर्शन (अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय) : चंद्रकांत कुळकर्णी (हॅम्लेट, एक लाख ५० हजार), आदित्य इंगळे (सोयरे सकळ, एक लाख), अद्वैत दादरकर (एका लग्नाची पुढची गोष्ट, ५० हजार). नाट्यलेखन : डॉ. समीर कुलकर्णी (सोयरे सकळ, एक लाख), रत्नाकर मतकरी (आरण्यक, ६० हजार), दिग्पाल लांजेकर (ऑपरेशन जटायू, ४० हजार). प्रकाश योजना : प्रदिप मुळ्ये (हॅम्लेट, ४० हजार), प्रदीप मुळ्ये (सोयरे सकळ, ३० हजार),  शीतल तळपदे (आरण्यक, २० हजार). नेपथ्य : प्रदीप मुळ्ये (हॅम्लेट, ४० हजार), प्रदीप मुळ्ये (सोयरे सकळ, ३० हजार), संदेश बेंद्रे (ऑपरेशन जटायू, २० हजार). संगीत दिग्दर्शन : राहुल रानडे (हॅम्लेट, ४० हजार), अजित परब (सोयरे सकळ, ३० हजार), कौशल इनामदार (आरण्यक, २० हजार). वेशभूषा : गीता गोडबोले (सोयरे सकळ, ४० हजार), प्रदीप मुळ्ये (हॅम्लेट, ३० हजार), मेघा जकाते (आरण्यक, २० हजार). रंगभूषा : सचिन वारीक (सोयरे सकळ, ४० हजार), उल्लेश खंदारे (हॅम्लेट, ३० हजार), उल्लेश खंदारे (आरण्यक, २० हजार).

उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक व ५० हजार रुपये : पुरुष कलाकार : भरत जाधव (वन्स मोअर), प्रशांत दामले (एका लग्नाची पुढची गोष्ट), सुमीत राघवन (हॅम्लेट), उमेश कामत (दादा एक गुड न्यूज आहे), सतीश राजवाडे (अ परफेक्ट मर्डर). स्त्री कलाकार : ऐश्वर्या नारकर (सोयरे सकळ), तेजश्री प्रधान (तिला काही सांगायचय), ऋता दुर्गुळे (दादा एक गुड न्यूज आहे), प्रतिभा मतकरी (आरण्यक), माधूरी गवळी (एपिक गडबड).

सहा ते २० मे या कालावधीत विलेपार्लेतील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह आणि बोरिवलीतील प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिर या ठिकाणी अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण १० व्यावसायिक नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अरविंद औंधे, विलास उजवणे, देवेंद्र पेम, अमिता खोपकर आणि शीतल क्षीरसागर यांनी काम पाहिले. सर्व पुरस्कार विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी अभिनंदन केले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search