सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील रोपळे बुद्रुक येथील श्री शिवाजीभाऊ बाबा पाटील विद्यालयात महात्मा ज्योतिबा फुलेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान एस. बी. राऊत यांनी भूषविले.
या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजयकुमार सरडे, मुख्याध्यापक एस. एम. बागल, पर्यवेक्षक डी. एम. गणपाटील, बी. एम. पुजारी, टी. टी. ननवरे, सोमनाथ जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी पुजारी व ननवरे यांनी आपल्या मनोगतात महात्मा फुलेंचे जीवनचरित्रावर प्रकाश टाकला; तसेच विद्यार्थ्यांना महात्मा फुलेंचे विचार आचरणात आणण्याचे त्यांनी आवाहन केले. मान्यवरांचे स्वागत यश सदाशिव खरे याने केले. संस्कृती संतोष पवार, तनुजा आबासो माने, स्वराली प्रसाद कदम या विद्यार्थिनींनी भाषण केले.
प्रगती मोहन काळे हिने सूत्रसंचालन केले. सृष्टी विलास पाटील हिने आभार हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कला शिक्षक कल्लेश्वर पानसांडे, सर्व सहकारी शिक्षक आणि सहावीतील विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले.