Next
पुण्यात रंगणार सुगम, चित्रपट संगीताची मैफल
BOI
Sunday, August 05, 2018 | 10:15 AM
15 0 0
Share this article:

पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत चारूशीला गोसावी प्रस्तुत ‘व्हायोलिन गाते तेव्हा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम १० ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता सरदार महादेव बळवंत नातू सभागृहात होणार आहे.

सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम मालिकेतील हा ५१ वा कार्यक्रम असून, यात सुगम संगीत, चित्रपट संगीत आणि जुन्या हिंदी संगीताची ही सुरेल मैफल रंगणार आहे. ‘विद्या भवन’चे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली.

चारूशीला गोसावी या व्हायोलिन वाद्यावर शास्त्रीय संगीत, नाट्गीते, मराठी-हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध गीते, अभंग सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचे निवेदन राजय गोसावी करणार आहेत. डॉ. राजेंद्र दूरकर (तबला), अमृता ठाकूरदेसाई (सिंथेसायझर), राजेंद्र साळुंके (ताल वाद्ये) हे साथ संगत करणार आहेत.

चारूशीला या गेली ३७ वर्षे व्हायोलिन वादन सादर करत आहेत. त्यांनी आत्तापर्यंत शास्त्रीय, सुगम संगीत कार्यक्रमांमध्ये सोलो वादन आणि साथसंगत केली आहे. त्यांचे वडिल भालचंद्र देव यांच्याकडून त्यांनी ही विद्या आत्मसात केली आहे. २०१२मध्ये बाबा आमटे यांच्या हेमलकसा संस्थेच्या मदतीसाठी देखील त्यांनी ‘व्हायोलिन गाते तेव्हा’ या कार्यक्रमाचे सादरीकरण केले होते.

कार्यक्रमाविषयी :
दिवस :
शुक्रवार, १० ऑगस्ट २०१८
वेळ : सायंकाळी सहा वाजता
स्थळ : सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, भारतीय विद्या भवन, सेनापती बापट रोड, पुणे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search