Next
‘महिंद्रा लॉजिस्टिक्स’च्या उत्पन्नात वाढ
प्रेस रिलीज
Friday, May 11 | 02:27 PM
15 0 0
Share this story

मुंबई : महिंद्रा लॉजिस्टिक्स लि. (एमएलएल) या थ्रीपीएल सोल्यूशन देणाऱ्या भारतातील एका सर्वात मोठ्या कंपनीने ३१ मार्च २०१८पर्यंतच्या तिमाहीतील व आर्थिक वर्षातील एकत्रित आर्थिक निकाल नुकतेच जाहीर केले.

आर्थिक वर्ष २०१८मधील कामगिरीशी आर्थिक वर्ष २०१७शी तुलना केल्यास उत्पन्नामध्ये २८ टक्के म्हणजे तीन हजार ४१६ कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. एबिटामध्ये ४६ टक्के म्हणजे ८६ कोटी रुपयांवरून १२६ कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. करपूर्व नफ्यात ५१ टक्के म्हणजे ६८ कोटींवरून १०२ कोटींपर्यंत वाढ झाली आहे; तसेच करोत्तर नफ्यात ४२ टक्के म्हणजे ४६ कोटींवरून ६५ कोटींपर्यंत,  तर ईपीएसमध्ये (डायल्युटेड) ३७ टक्के म्हणजे ६.६२ रुपयांवरून ९.०४ रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.

आर्थिक वर्ष २०१८मधील चौथ्या तिमाहीतील कामगिरीशी २०१७ आर्थिक वर्षाशी तुलना करता उत्पन्नामध्ये ७२३ कोटींवरून ८९३ कोटींपर्यंत वाढ झाली आहे. एबिटामध्ये ७५ टक्के म्हणजे २२ कोटींवरून ३९ कोटींपर्यंत वाढ झाली आहे. करपूर्व नफ्यात ९६ टक्के म्हणजे १७ कोटींवरून ३२ कोटींपर्यंत वाढ झाली आहे. करोत्तर नफ्यात ७० टक्के म्हणजे १२ कोटींवरून २१ कोटींपर्यंत, तर ईपीएसमध्ये (डायल्युटेड) ६७ टक्के म्हणजे १.७ रुपयांवरून २.८७ रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.

सूचिबद्ध होण्याच्या पहिल्या वर्षात, संचालक मंडळाने १५ टक्के (प्रति शेअर १.५० रुपये) लाभांशाची शिफारस केली आहे. एससीएम व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नात चांगली वाढ झाल्याने कंपनीने उत्कृष्ट कामगिरीमध्ये सातत्य ठेवले: नॉन-महिंद्रा व्यवसायात ३२ टक्क्याने, तर महिंद्रा व्यवसायात २८ टक्क्यांनी वाढ झाली. फ्रेट फॉरवर्डिंग, कन्झ्युमर व फार्मा आणि ऑटो व इंजिनीअरिंग ग्राहक यांच्या उत्पन्नातील वाढीमुळे नॉन-महिंद्रा एससीएम व्यवसायाने प्रगती केली.

महिंद्रा लॉजिस्टिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी पिरोजशा सरकारी (फिल) यांनी आर्थिक कामगिरीविषयी सांगितले, ‘आम्ही ०.५ अब्ज डॉलरहून अधिक उत्पन्न मिळवून महत्त्वाचा मैलाचा टप्पा साध्य केला आहे. आमच्या महिंद्रा व नॉन-महिंद्रा व्यवसायांनी अंदाजे १०० कोटी रुपये करपूर्व नफा कमावून प्रगतीमध्ये सातत्य राखले आहे. ‘एमएलएल’ने जीएसटी व ई-वे बिल असे मुख्य व्यवहार परिणामकारकपणे हाताळले आहेत. अनुकूल धोरणे व व्यवसाय करण्यातील सुलभता या बाबतीत सरकारने या क्षेत्राकडे विशेष लक्ष दिले आहे, हे समाधानकारक आहे. भारतातील एक आघाडीची थ्रीपीएल कंपनी म्हणून, देशातील लॉजिस्टिक्सचा खर्च कमी करण्यासाठी धोरणकर्त्यांबरोबर काम करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link