Next
‘पै इंटरनॅशनल स्कूल ऑफ हेअर अँड ब्युटी’चे उद्घाटन
प्रेस रिलीज
Monday, September 03, 2018 | 12:53 PM
15 0 0
Share this article:



पुणे : गोल्डन ज्युबिली एज्युकेशन ट्रस्ट संचालित पै इंटरनॅशनल स्कूल ऑफ हेअर अँड ब्युटीचे उद्घाटन इंटरनॅशनल हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब यांच्या हस्ते झाले.

डॉ. पी. ए. इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात ट्रस्टचे अध्यक्ष एस. बी. एच. इनामदार, उपाध्यक्ष शाहीद शेख, माजी नगरसेवक रवींद्र माळवदकर, हाजी गुलाम आझम एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष मुनव्वर पीरभॉय, एस. ए. इनामदार, अब्दुल शेख, शाहिद मुनीर, दानिश खान, युसूफ शेख यांसह विविध ब्युटीपार्लरचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

पै इंटरनॅशनल स्कूल ऑफ हेअर अँड ब्युटीमध्ये केशरचनांचे आणि सौंदर्यप्रसाधनविषयक प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये इंटरनॅशनल डिप्लोमा, सिडिस्को ब्युटी अँड बॉडी डिप्लोमा,  सिडिस्को स्पा डिप्लोमा, सिडिस्को मेक-अप डिप्लोमा, सिडिस्को अॅरोमा थेरपी, इंटरनॅशनल सर्टिफिकेशन कोर्सेस इन सिडिस्को स्किन केयर, इंटरनॅशनल सर्टिफिकेशन कोर्सेस इन अनेस्थेटिकस, बॉडी थेरपी, नेल आर्ट यांचा समावेश आहे.

बेसिक डिप्लोमा कोर्समध्ये डिप्लोमा इन बेसिक ब्युटी सर्व्हिस, डिप्लोमा इन हेअर ड्रेसिंग, प्रोफेशनल हेयर अँड ब्युटी डिप्लोमा, डिप्लोमा इन अॅडव्हान्स अनेस्थेटिकस, डिप्लोमा इन क्लिनिकल अनेस्थेटिकस, डिप्लोमा इन मेक अप, डिप्लोमा इन बॉडी थेरपी, डिप्लोमा इन स्वीडिश बॉडी मसाज, डिप्लोमा इन स्पा थेरपी आदी अभ्यासक्रम आहेत. हे अभ्यासक्रम उच्च प्रशिक्षित आणि क्रिएटिव्ह ट्रेनर्सच्या उपस्थितीत शिकविले जाणार आहेत.

हा कार्यक्रम भवानी पेठेतील गोल्डन ज्युबिली एज्युकेशन ट्रस्ट येथे झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोशन आरा शेख आणि रुमाना शेख यांनी केले. प्रास्ताविक वाहिद बियाबानी यांनी केले. अयाज शेख यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search