Next
आनंद महिंद्रांनी शब्द पाळला! कार्यालयातून प्लास्टिक बाटल्या हद्दपार!
एका तरुणीने ट्विटद्वारे केलेल्या सूचनेची घेतली दखल
BOI
Wednesday, September 18, 2019 | 04:05 PM
15 1 0
Share this article:

आनंद महिंद्रानवी दिल्ली : उद्योजक आनंद महिंद्रा यांनी आपल्या कार्यालयातील प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर बंद करून स्टील आणि तांब्याच्या बाटल्यांचा वापर सुरू केला आहे. नुकताच त्यांनी या बाटल्यांचा फोटो ट्विट करून या बदलाची माहिती सर्वांना दिली. जुलैमध्ये संचालक मंडळाच्या एका बैठकीचा फोटो त्यांनी ट्विट केला होता. त्या वेळी तेथे पिण्याच्या पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या असल्याचे निरीक्षण नोंदवून त्याऐवजी स्टीलच्या बाटल्या वापरण्याची सूचना एका तरुणीने त्यांना केली होती. त्या सूचनेची दखल त्यांनी घेतली आहे.

आनंद महिंद्रा यांनी १६ जुलै रोजी महिंद्रा आणि महिंद्राच्या संचालक मंडळाच्या बैठकीचा फोटो ट्विट केला होता. अशा बैठकींना प्लास्टिकच्या बाटल्या वापरण्याऐवजी स्टीलच्या पुन्हा वापरण्याजोग्या बाटल्या वापराव्यात, अशी सूचना एका तरुणीने त्या ट्विटवर केली होती. महिंद्रा यांनी त्या ट्विटची दखल घेतली होती. ‘लवकरच या प्लास्टिकच्या बाटल्या बंद केल्या जातील. आम्हालाही त्या बाटल्या तेथे पाहून शरमल्यासारखे झाले होते,’ असे उत्तर त्या वेळी त्यांनी दिले होते. 

अवघ्या दोनच महिन्यांमध्ये आनंद महिद्रांनी आपला शब्द खरा ठरवला. आता कंपनीच्या बोर्डरूममध्ये धातूच्या बाटल्या वापरण्यात येणार असल्याचे त्यांनी फोटोसह ट्विटरवर जाहीर केले आहे. या नवीन बाटल्या पुन्हा वापरता येण्याबरोबरच दिसायलाही अधिक सुंदर असून, यासाठी काम करणाऱ्या कंपनीमधील रिटेल टीमचेही त्यांनी आभार मानले आहेत. पर्यावरणाबाबत सजग असलेल्या आनंद महिंद्रा यांच्या या कृतीबद्दल कौतुक होत आहे.

दरम्यान, ‘सिंगल युज प्लास्टिक’चा वापर थांबवण्यासाठी केंद्र सरकारनेही कंबर कसली असून, येत्या दोन ऑक्टोबरपासून प्लास्टिक वापरावर कठोर निर्बंध घालण्यात येणार आहेत. प्लास्टिकबंदीसंबंधी राज्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. 
 
 
 
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search