Next
‘नोब्रोकरडॉटकॉम’ने सादर केले ‘नोब्रोकरहूड’ अॅप
प्रेस रिलीज
Saturday, July 28, 2018 | 04:07 PM
15 0 0
Share this story

मुंबई : रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर क्रांती घडवून घर शोधण्याची पद्धत बदल्यानंतर ‘नोब्रोकरडॉटकॉम’ आता गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सुरक्षेला सुधारण्यास सज्ज झाले आहे. या पोर्टलने अलीकडेच ‘नोब्रोकरहूड’ अॅप सादर केले आहे. ही तंत्रज्ञानाने सक्षम अशी भेटकर्ता आणि सामुदायिक व्यवस्थापन प्रणाली आहे, जी बंगलोर, मुंबई आणि गुरगांव येथून सुरुवात करत गृहनिर्माण सोसायट्या आणि टाउनशिपमधील रहिवाशांचे जीवन अधिक सुविधाजनक आणि सुरक्षित बनवेल. २०२०पर्यंत किमान एक लाख निवासी समुदायांना यामध्ये सामिल करण्याचे ध्येय ‘नोब्रोकरडॉटकॉम’ने ठेवलेले आहे.

‘नोब्रोकरहूड’ विविध सेवा आणि सुविधा सादर करीत आहे आणि ज्यामुळे वापरकर्त्यांना निवासी इमारती, गृहनिर्माण सोसायटी आणि गेटेड समुदायांमधील विविध उपक्रमांचे व्यवस्थापन करता येईल जसे की, भेटकर्त्यांच्या प्रवेशावर देखरेख करण्यास घरातून मदत शोधणे आणि भेटकर्त्याच्या भेटीला ओटीपीद्वारे आधीच अधिकृत करणे. सर्व एंट्री आणि एक्झिट्सच्या व्हिजुअल आणि डिजिटल रेकॉर्ड बनवून ते सुरक्षा पैलुला आणखी मजबूत करते. हे रेकॉर्ड कधीही आणि कुठेही वापरण्यायोग्य असतात आणि बायोमेट्रीक प्रक्रियेद्वारे कर्मचाऱ्यांच्या एंट्रीला स्वयंचलित करते.

हे अॅप वापरण्यास सोपे आहे असून, तंत्रज्ञानाची फारशी ओळख नसलेल्या वरिष्ठ नागरिकांसाठी सोप्या सुविधा यामध्ये आहे. रहिवाशी फक्त ओटीपीद्वारे भेटकर्त्याला आधीच-प्रमाणीकृत करू शकतात किंवा भेटकर्ता गेटवर आल्यावर ड्युटीवरील गार्ड त्यांचा तपशील अॅपमध्ये टाकेल आणि संबंधित रहिवाश्याला सूचित करेल.

‘नोब्रोकरडॉटकॉम’चे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी अखिल गुप्ता म्हणाले, ‘नोब्रोकरडॉटकॉम करीत असलेल्या प्रत्येक गोष्टीच्या केंद्रभागी तंत्रज्ञान आहे. आजचे चाणाक्ष भारतीय जीवनाच्या दर्जाला महत्त्व देतात आणि त्यांना विनात्रासाच्या गोष्टी हव्या आहेत. निवासी रिअल इस्टेट बाजारात आणखी खोलवर शिरल्यावर आम्हाला जाणवले की, आपले वास्तव्य अधिक सुरक्षित आणखी सुविधाजनक बनवण्यास आपल्याला उपायांची गरज आहे. तंत्रज्ञानामध्ये सुविधा आणि आराम प्रदान करण्याची आणि मानवांवर अवलंबित्व कमी करण्याची क्षमता आहे, जे आमच्या कंपनीच्या मुख्य उद्दिष्टांपैकी एक आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link