Next
दिव्यांग व गरीब विद्यार्थ्यांसाठी सुधागड सेवा संघाचा मदतीचा हात
BOI
Wednesday, July 24, 2019 | 04:32 PM
15 0 0
Share this article:


ठाणे : येथील ‘सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ’ संस्थेतर्फे पितृछत्र हरवलेल्या, दिव्यांग व गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक व आर्थिक सहकार्य करण्यात आले. पाचपाखडी येथील ज्ञानराज सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात यशस्वी तरुण उद्योजकांचा सत्कारही करण्यात आला. 

दर वर्षीप्रमाणे यंदाही सुधागड रहिवासी सेवा संघाच्या वतीने गरजू मुलांना मदत करण्यात आली. ठाणे शहर व सुधागड ग्रामीण भागांतील मार्च २०१९च्या माध्यमिक शालांत परीक्षेत ९० टक्के व अधिक गुण संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा व विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले, तसेच सभासदांच्या दहावी, बारावी व पदवीधर मुलांचा गौरव करण्यात आला. यामध्ये पहिली ते नववीच्या हुशार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. 

‘रोटरी क्लब ऑफ ठाणे’चे नवनिर्वाचित अध्यक्ष अच्युत दामले, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी अशोक टिळक आणि उद्योजक विजय सागळे यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल बाबू घाडगे यांनी मागील वर्षाच्या शैक्षणिक कामाची माहिती दिली. सुधागड तालुक्यातील मुलांना शिक्षणात, नोकरी व व्यवसायात पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन व मदतीची गरज असल्याचे सांगून त्यासाठी सर्वांनी मिळून एकत्र काम करण्याचे विनंतीवजा आवाहन त्यांनी केले. 

अच्युत दामले यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले,  ‘मी प्रथमच तुमच्या संस्थेचे शैक्षणिक कार्य पाहत आहे. तरीदेखील तुमच्या या सामाजिक कार्याला रोटरी क्लब ऑफ ठाणेतर्फे व वैयक्तिकरीत्या जेवढी मदत करता येईल, ती करणार आहे.’ संस्थेचे हितचिंतक व देणगीदार सुरेश मेश्राम यांना या वेळी ‘सुधागड मित्र’ या पुरस्काराने गौरवण्यात आले. संस्थेचे चिटणीस अविकांत साळुंके यांचा यशस्वी उद्योजक म्हणून या वेळी सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना त्यांनी सांगितले, ‘मी हातात पैसे नसताना उद्योग सुरू करण्याचे धाडस केले. त्यासाठी मला माझे वडील, भाऊ-वहिनी व पत्नीने खूप मदत केली तसेच संस्थेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही सहकार्य केले. त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो.’

संस्थेचे विद्यमान अध्यक्ष विठ्ठल घाडगे, शिक्षणसमिती प्रमुख वसंत लहाने व माजी अध्यक्ष विठ्ठल खेरटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी सल्लागार रमेश सागळे, उपाध्यक्ष शंकर काळभोर, चिटणीस अविकांत साळुंके, खजिनदार विजय पवार, कार्याध्यक्ष प्रकाश शिलकर, रघुनाथ इंदुलकर, प्रकाश वाघमारे, दत्ता सागळे, सुनील तिडके, सखाराम खामकर, विजय जाधव, मोहन भोईर, जनार्दन घोंगे, दत्तात्रय दळवी, गजानन जंगम, हरिश्चंद्र मालुसरे, अनिल सागळे, अनिल चव्हाण यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी सल्लागार गणपत डिगे, सुरेश शिंदे, गोपीनाथ दुर्गे, प्रवीण तेलंगे यांची उपस्थिती लाभली. संस्थेचे सरचिटणीस राजू पातेरे यांनी सूत्रसंचालन केले व सर्वांचे आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search