Next
पर्यटकांसाठी रायगडावरील ‘ई-बुक’
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले प्रकाशन
BOI
Wednesday, January 09, 2019 | 06:45 PM
15 0 0
Share this story


मुंबई : रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती एकत्रितरीत्या उपलब्ध व्हावी, यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘रायगड : पर्यटन विविधा’, या ‘ई-बुक’चे नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. रायगड जिल्ह्यात येणाऱ्या सर्व पर्यटकांना माहिती देणाऱ्या ‘मोबाईल ॲप’चेही या वेळी उद्घाटन करण्यात आले.

रायगड जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने समृद्ध असा जिल्हा आहे. याठिकाणच्या पर्यटन स्थळांची संपूर्ण माहिती पर्यटकांना सोप्या पद्धतीने एकत्रितपणे उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून, जिल्हा माहिती कार्यालय, रायगड यांच्यामार्फत हे ‘ई-बुक’ आणि ‘मोबाईल अॅप’ तयार करण्यात आले आहे. 

मंत्रालयातील मुख्यमंत्री सचिवालयात असलेल्या समिती सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रिमोट कंट्रोलद्वारे या ई-बुकचे प्रकाशन करण्यात आले. हे ई-बुक www.raigadtourism.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच इतर काही मराठी 'ई-बुक्स'च्या संकेतस्थळांवरही ते उपलब्ध असेल. याबरोबरच विकसित करण्यात आलेल्या ‘मोबाईल ॲप’मध्ये पर्यटनस्थळे, निवास, भोजन सुविधा, मार्ग, नकाशे, वाहन सुविधा आदींबाबत माहिती व सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांचे पर्यटन सुकर होण्यास मदत होणार आहे. या पुस्तकात रायगड जिल्ह्यातील लेणी, गड-किल्ले, ऐतिहासिक पर्यटनस्थळे, धार्मिक स्थळे, समुद्र किनारे, साहसी पर्यटन, धबधबे आदी समग्र पर्यटन स्थळांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. जगभरातील मराठी वाचकांना रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती पोहोचविणाऱ्या या उपक्रमाचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी कौतुक केले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link