Next
‘लाइव्हमी’ अॅपवर पाच नव्या श्रेणींची भर
प्रेस रिलीज
Wednesday, May 30, 2018 | 11:14 AM
15 0 0
Share this article:

मुंबई : लाइव्हमी या भारताच्या पहिल्या लाइव्ह ब्रॉडकास्टिंग आणि सामाजिक सहभागाच्या मंचाने वापरकर्त्यांशी सहभाग वाढवण्यास व त्यांना विविध क्षेत्रांतील व्यापक श्रेणींचा सर्वोत्तम मजकूर सादर करण्यासाठी पाच नवीन श्रेणी सादर केल्या आहेत. यात लाइव्ह मनोरंजन, गेमर्सचा लाइव्ह गेम, लाइव्ह लॉफ्टर चॅलेंज, लाइव्ह बॉलिवुड आणि लाइव्ह संगीत यांचा समावेश असून, याचा उद्देश वापरकर्त्यांची समग्र मनोरंजनाची गरज भागवणे आणि प्रतिभावान तरुणांना त्यांच्या कौशल्यांचे प्रदर्शन करण्यासाठी भक्कम मंच प्रदान करणे हा आहे.

जगभरातील ६० दशलक्ष वापरकर्त्यांच्या अपेक्षांवर खरे उतरताना लाइव्हमी हा एक खुला मंच आहे ज्यामध्ये शोधण्यासाठी प्रचंड मजकूर आहे. एप्रिल २०१७ मध्ये भारतात शुभारंभ झालेल्या लाइव्हमीचे देशभरात १३ दशलक्ष डाउनलोड झालेले आहे. पुन्हा डिझाइन केल्यावर दर दिवशी ७५ टक्क्यांवरून ९५ टक्क्यांपर्यंत बघण्याचा दर वाढवणे हे लक्ष्य लाइव्हमीने ठेवलेले आहे.

लाइव्हमीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि चीताह मोबाईलच्या वरिष्ठ उपाध्यक्ष युकी ही म्हणाल्या, ‘लाइव्ह स्ट्रिमिंग हे आजच्या तरुण व तंत्रज्ञानप्रेमी ग्राहकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेले आहे. लोकांना सर्व घडामोडी लाइव्ह बघायच्या असतात आणि त्यांच्या आवडत्या शोविषयी अपडेट रहायचे असते. बरेच तरुण भारतीयसुद्धा अशा रस्त्याच्या शोधात असतात जेथे ते त्यांची प्रतिभा दाखवू शकतील आणि प्रसिद्धी मिळवू शकतील. लाइव्हमीमध्ये आम्ही सतत एकाच मंचावर आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम सहभागाचे पर्याय सादर करण्यास आणि त्यांच्या मनोरंजनाच्या गरजा पूर्ण करण्यास प्रयत्नशील असतो. आमचा पूर्ण विश्वास आहे की नवीन सादर केलेल्या श्रेण्यांना आमच्या वापरकर्ता वर्गामध्ये प्रचंड लोकप्रियता मिळेल, त्यांना प्रचंड सामग्रीतून निवड करण्यास सक्षम बनवेल आणि त्यांना लाइव्ह मनोरंजनाचा आनंद अनुभवण्याची संधी प्रदान करेल.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search