Next
पुणे येथे राज्यस्तरीय गायन स्पर्धा
प्रेस रिलीज
Friday, January 12 | 04:42 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर कला, क्रीडा, सांस्कृतिक विभागाच्या वतीने ‘व्हॉइस ऑफ पुणे सिगिंग सिटी आयडॉल्स्’ या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे यंदाचे प्रथम वर्ष आहे. पुणे शहराच्या सांस्कृतिक नगरीत गायनाची चळवळ संपन्न अधिकाधिक वृद्धिंगत व्हावी, रुजावी आणि कलावंतांना एक दर्जेदार व्यासपीठ मिळावे या प्रमुख उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे’, अशी माहिती विभागाचे अध्यक्ष बाबा पाटील यांनी दिली.

या स्पर्धेची प्रथम फेरी पुणे आणि महाराष्ट्रातील इतर शहरांमधून होणार आहे. या स्पर्धेत सुमारे एक हजार स्पर्धक सहभागी होणार आहेत. प्रथम क्रमांकासाठी २५ हजार रुपये रोख, द्वितीय क्रमांकास २० हजार, तृतीय क्रमांकास १५ हजार, चतुर्थ क्रमांकास रूपये १० हजार रोख आणि प्रत्येकी सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे; तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.

पुणे शहर राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष खासदर वंदना चव्हाण, सांस्कृतिक विभाग प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत खाबीया, प्रवक्ते अंकुश काकडे यांचेही या स्पर्धेला सहकार्य लाभत आहे.

स्पर्धेचे उद्घाटन चार्ली स्टुडिओ येथे लिटील चँप विजेती गायिका कार्तिकी गायकवाड यांच्या हस्ते सकाळी ९. ३० वाजता होणार आहे. याप्रसंगी गायिका वैशाली सामंत, प्रसाद ओक, पुण्यातील संगीतकार उपस्थित राहणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या संयोजन समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर कला, क्रीडा, सांस्कृतिक विभागाचे प्रवक्ते योगेश सुपेकर, उपाध्यक्ष नितीन मोरे, शेखर गरुड, सरचिटणीस केदार मोरे, चिटणीस संदीप पळीवाले, संघटक इकबाल सरबार, माणिक बजाज यांचा समावेश आहे.

स्पर्धेविषयी :
दिवस :
२३ व २४ जानेवारी २०१८
वेळ : सकाळी नऊ वाजता
स्थळ : चार्ली स्टुडिओ, मेडिप्रोब हाऊस, ७१०/ब, गुरूनानक नगर, कुमार पॅसिफिक मॉल समोर, शंकरशेठ रोड, पुणे

अंतिम फेरी आणि बक्षीस समारंभ :
दिवस : २५ जानेवारी २०१८
वेळ : सकाळी ११ वाजता
बक्षीस समारंभ : सायंकाळी पाच ते आठ
स्थळ : बालगंधर्व रंगमंदिर
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link