Next
‘होंडा’तर्फे पुण्यात राष्ट्रीय रस्ते सुरक्षा जागृती अभियान
प्रेस रिलीज
Saturday, June 01, 2019 | 12:42 PM
15 0 0
Share this article:


पुणे : कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा (सीएसआर) भाग म्हणून रस्ते सुरक्षा जागृती करण्यासाठी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडतर्फे रस्ते सुरक्षा जागृती उपक्रम पुणे येथे आयोजित करण्यात आले होते. 

‘होंडा’ने पुण्यातील औंध येथील गव्हर्नमेंट आयटीआय गर्ल्स कॉलेजमध्ये राष्ट्रीय रस्ते सुरक्षा जागृती अभियानाचे आयोजन केल होते. या तीन दिवसांच्या कार्यक्रमात दोन हजार ३००हून अधिक कॉलेज विद्यार्थिनींना रस्ते सुरक्षा प्रशिक्षणाद्वारे रस्ते सुरक्षेबाबत सक्षम केले. जानेवारी २०१९मध्ये ‘होंडा टू-व्हीलर्स इंडिया’ने प्रामुख्याने कॉलेज युवकांसाठी आजवरचा सर्वांत मोठा राष्ट्रीय रस्ते सुरक्षा जागृती कार्यक्रम सुरू केला. ‘होंडा’ दरमहा भारतातील दहा महाविद्यालयांतील १५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांमध्ये रस्ते सुरक्षेविषयी जागृती करत आहे. ‘होंडा’च्या या सीएसआर उपक्रमाने आतापर्यंत ३३ शहरांतील ७४ हजारांहून अधिक कॉलेज विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले आहे.

‘होंडा’ कॉलेजमधील विद्यार्थ्यांपर्यंत का पोहोचत आहे व रस्ते सुरक्षा जागृतीची आवश्यकता या विषयी माहिती देताना ‘होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया’चे ब्रँड व कम्युनिकेशनचे उपाध्यक्ष प्रभू नागराज म्हणाले, ‘होंडा रस्ते सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देते आणि हा ‘होंडा’च्या सीएसआरचा मूलभूत स्तंभ आहे. आजचे तरुण रस्त्याचा वापर करणारा महत्त्वाचा घटक आहेत, शिवाय भविष्यातील टू-व्हीलर रायडरही आहेत. भारतातील रस्ते सुरक्षित राहावेत, यासाठी सुरुवातीपासूनच रस्ते सुरक्षेबाबत जागृती करणे, हे ‘होंडा’च्या कॉलेज विद्यार्थ्यांसाठीच्या ‘होंडा’ राष्ट्रीय रस्ते सुरक्षा जागृती अभियानाचे उद्दिष्ट आहे. या अभियानात पुण्यातील दोन हजार ३०० कॉलेज विद्यार्थिनी सहभागी झाल्या आणि होंडाबरोबर दी सेफ्टी प्रॉमिस’ घेतले.’

‘होंडा’ महिलांना स्वतंत्र वाहतूक सुविधा देऊन सक्षम करत आहे. विद्यार्थिनींना केवळ चार तासांमध्ये टू व्हीलर रायडिंगचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले. ‘होंडा’च्या कुशल इन्स्ट्रक्टरनी विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावरील नियम, वाहतुकीची चिन्हे व सुरक्षित रायडिंग तंत्रे याबद्दल थेअरी सेशन तयार करून त्यांचा पाया निर्माण केला. रायडिंग करत असणाऱ्या किंवा लवकरच रायडिंग करणार असणाऱ्या अनेक कॉलेज विद्यार्थ्यांसह होंडाने रस्त्यावर प्रत्यक्ष रायडिंग करण्यापूर्वी त्यांची धोका ओळखण्याची क्षमता वाढवली. विद्यार्थ्यांनी ‘होंडा’च्या व्हर्च्युअल रायडिंग सिम्युलेटरवर रस्त्यावरील १०० हून अधिक संभाव्य धोक्यांचा अनुभव घेतला.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search