Next
‘मराठी सिनेमा माझे माहेर’
BOI
Thursday, May 17 | 12:45 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘हिंदी सिनेमा म्हणजे माझे सासर आहे, तर मराठी सिनेमा म्हणजे माहेर आहे. त्यामुळे ‘बकेट लिस्ट’च्या निमित्ताने माहेरी आल्यासारखे वाटत आहे,’ अशी भावना बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित हिने व्यक्त केली.

माधुरी दीक्षित ‘बकेट लिस्ट’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असून, तिचा पहिला मराठी चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. या आगामी मराठी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी माधुरी पुण्यात आली होती. त्यावेळी तिने पत्रकारांशी संवाद साधला.

‘अलीकडच्या काळात मराठी चित्रपटांत खूप चांगले विषय हाताळते जात आहे. त्यामुळे मराठी सिनेमात काम करण्यासाठी मी देखील चांगल्या कथानकाच्या शोधात होते. मराठी सिनेमात काम करणे माझ्या ‘बकेट लिस्ट’चा भाग होते, जे या चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण झाले आहे याचा विशेष आनंद आहे,’ असे माधुरीने या वेळी सांगितले.

मराठी चित्रपटांत काम, तर यापुढेही करणार असून, निर्मितीमध्ये विशेष असल्याचे स्पष्ट करतानाच लवकरच ‘१५ ऑगस्ट’ हा मराठी चित्रपट येणार असल्याची माहिती माधुरीने दिली. या वेळी ‘बकेट लिस्ट’मधील सहकलाकार सुमित राघवन, दिग्दर्शक तेजस देवस्कर उपस्थित होते.

(‘बकेट लिस्ट’ या चित्रपटाविषयी संवाद साधताना माधुरी दीक्षित )

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link