Next
विरारमंध्ये रंगणार एकता सांस्कृतिक महोत्सव
मिलिंद जाधव
Thursday, December 20, 2018 | 05:18 PM
15 0 0
Share this story

विरार : महाराष्ट्रभर विविध सांस्कृतिक उपक्रमाच्या माध्यमातून विचारमंच उपलब्ध करून देणाऱ्या एकता कल्चरल अकादमीतर्फे २१ व २२ डिसेंबर २०१८ या कालावधीत पालघर जिल्ह्यात एकता सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले आहे. हा महोत्सव विरार शहरातील भाऊसाहेब वर्तक हॉल येथे होणार असून, हे या महोत्सवाचे ३० वे वर्ष आहे.

महोत्सवात विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून, यातील विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. समूह नृत्य स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे १५ हजार, १० हजार आणि पाच हजार, रोख रुपये, तसेच पारंपारिक नृत्य, उत्तेजनार्थ, उत्कृष्ट दिग्ददर्शन, अभिनय, गायन, काव्यवाचन, एकेरी नृत्य या स्पर्धेतील विजेत्यांनाही पारितोषिके, एकता सुवर्णपदक, प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे; तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
 
मुंबई आणि महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यातील, तसेच महाविद्यालयीन कलावंतांना या एकता सांस्कृतिक महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन एकता कल्चरल एकदमीचे अध्यक्ष कवी प्रकाश जाधव यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी पत्ता : ए/२०४, विशाल हेवन हाउसिंग सोसायटी, मनवेलपाडा रोड, विरार (पूर्व).
संपर्क : ८३६९१ ५३४८३, ९८६०२ ६९६७५, ९८९०५ ६०९९९
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link