Next
‘सिग्ना’च्या एमडी आणि सीईओपदी प्रसून सिकदार
प्रेस रिलीज
Wednesday, June 27, 2018 | 05:24 PM
15 0 0
Share this story

मुंबई : सिग्ना टीटीके हेल्थ इन्शुरन्स कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी प्रसून सिकदार यांची नियुक्ती करण्यात आली. ‘इन्शुरन्स रेग्युलेटरी अॅंड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया’च्या (आयआरडीएआय) मंजुरीनंतर या नियुक्तीची घोषणा कंपनीतर्फे करण्यात आली.

सिकदार यांनी संदीप पटेल यांच्याकडून सूत्रे स्वीकारली. पटेल हे आता ‘सिग्ना’चे ‘चीफ स्ट्रॅटेजी’ आणि ‘जेव्ही ऑफिसर’ म्हणून काम पाहणार आहेत; तसेच ‘सिग्ना टीटीके हेल्थ इन्शुरन्स बोर्डा’चे संचालक म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

‘सिग्ना’ कंपनीची भारतामधील स्थिती अत्यंत भक्कम असून ती आणखी बळकट करण्याची जबाबदारी सिकदार यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या कंपनीचा ग्राहकवर्ग विस्तारीत असून, त्यात आणखी भर घालण्यासाठी नवनवीन प्रॉडक्ट्सची निर्मिती आणि सेवा पुरविण्याकडे सिकदार यांचा भर राहील. भागीदारी क्षेत्रामध्ये सिकदार यांचा मोठा अनुभव असल्यामुळे सिकदार कंपनीची वितरण चॅनेल्स वाढविण्यासाठी आपल्या टीमबरोबर कार्यरत राहणार आहेत. त्याद्वारे कंपनीचे ग्राहकांबरोबरचे नाते आणखी दृढ होणार असून ब्रॅंड व्हॅल्यूही वाढणार आहे.

सिकदार यांना वित्तीय सेवा क्षेत्राचा सुमारे २२ वर्षांचा अनुभव असून, इन्शुरन्स क्षेत्रामध्ये ते तज्ज्ञ आहेत. त्याचा लाभ ‘सिग्ना टीटीके’ला होणार आहे. ‘सिग्ना टीटीके’मध्ये दाखल होण्यापूर्वी सिकदार हे ‘येस बॅंके’चे ग्रुप अध्यक्ष आणि ग्लोबल हेड होते. या बॅंकेत त्यांनी इन्शुरन्स आणि म्युच्युअल फंड हातमिळवणी आणि भागीदारी क्षेत्रात उत्तम काम केले. तत्पूर्वी ते ‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स’चे संस्थापक सदऱ्य, वरिष्ठ महाव्यवस्थापक, मुख्य विक्री आणि वितरण विभाग या पदी कार्यरत होते.

‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स’मधील आपल्या १७ वर्षांच्या कार्यकाळात सिकदार यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यामध्ये ऑपरेशन्स अॅंड अंडररायटिंग, बॅंकअॅश्युरन्स, एजन्सी, अल्टरनेट वितरण, आरोग्य व्यवसाय आणि विक्री धोरण यांचा समावेश आहे. ‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ’मध्ये दाखल होण्यापूर्वी ते ‘जीई कॅपिटल’ (एसबीआय कार्डस्) आणि ‘सिटीकॉर्प’ या कंपन्यांशी संबंधित होते.

‘सिग्ना’च्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचे अध्यक्ष जेसन सॅडलर म्हणाले, ‘प्रसून सिकदार यांच्या नियुक्तीचा आम्हाला विशेष आनंद होतो आहे. सिकदार यांच्या नियुक्तीमुळे  भारतामधील आमची प्रगती आणखी वेगाने होईल; तसेच आम्ही आरोग्य क्षेत्रामधील आमची प्रॉडक्ट्स तसेच सेवा अधिक वेगाने ग्राहकांपर्यंत पोचवू. सिकदार यांचा नाविन्यासाठीचा आग्रह आणि त्यांचा दीर्घ अनुभवामुळे आमच्या कंपनीचे भारतीय बाजारपेठेमधील स्थान अधिक बळकट होईल.’

भारतामधील आरोग्य विमा क्षेत्रामध्ये वेगाने विस्तारणाऱ्या कंपन्यांमध्ये ‘सिग्ना टीटीके’चा समावेश आहे. नाविन्यपूर्ण प्रॉडक्ट्स आणि सेवा उपलब्ध करून या कंपनीने भारतीय आरोग्य क्षेत्रामध्ये आपले नाव उंचावले आहे. ही कंपनी २०१४ पासून भारतामध्ये कार्यरत झाल्यापासून खूप कमी वेळेत भारतीय बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे. भारतीय बाजारपेठेमधील प्रमुख वित्तीय संस्थांबरोबर नवीन भागीदारी करण्यात या कंपनीला यश आले आहे. २०१८ मध्ये भारतीय विमा शिखर परिषदेमध्ये ‘सिग्ना टीटीके’चा गौरव सर्वोत्कृष्ट आरोग्य विमा कंपनी म्हणून झाला असून दुसऱ्या वर्षीही ‘ग्रेट प्लेस टू वर्क’ हा सन्मान या कंपनीला मिळाला आहे.

आपल्या नवीन नियुक्तीबद्दल सिकदार म्हणाले, ‘सिग्ना टीटीके परिवाराचा एक भाग बनणे हा माझा सन्मान आहे. त्यामुळे या कंपनीचे नेतृत्व करण्याची संधी दिल्याचा मला आनंद आहे. आरोग्य विमा क्षेत्राची व्याप्ती सध्या वेगाने होत असून ‘सिग्ना’ला त्यामध्ये काम करण्याची मोठी संधी आहे. त्यामुळे ग्राहकांना उत्तम अनुभव देणे, कंपनीला नफा मिळवून देणे भारतामधील लाखो लोकांना चांगली आरोग्य सुविधा पुरविणे हे माझे उद्दिष्ट आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link