Next
मुंबई पोलिसांसाठी समृद्धी अभियानाचे आयोजन
प्रेस रिलीज
Monday, September 03, 2018 | 02:38 PM
15 0 0
Share this storyमुंबई : भारताचे सर्वात मोठे ब्रोकिंग हाउस असलेल्या आयसीआयसीआय सिक्युरिटिज् लि.ने आपल्या सुरक्षा दलांमधील कनिष्ठ श्रेणीच्या अधिकाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या साक्षर करण्याच्या उद्देशाने ‘समृद्धी’ हा उपक्रम सुरू केला असून, महाराष्ट्र पोलिस दलातील सुमारे ७५ कर्मचाऱ्यांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सहभागी कर्मचाऱ्यांना वित्तीय नियोजनाचे महत्त्व, शिस्तबद्ध दृष्टीकोन, गुंतवणुकीचे विविध मार्ग, लक्ष्य आधारित वित्तीय नियोजनाचे महत्त्व आणि शेअर बाजाराची मूलभूत माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या वरिष्ठ मान्यवरांमध्ये महाराष्ट्र पोलिस दलाचे विशेष पोलिस महानिरीक्षक (व्हीआयपी सुरक्षा) कृष्ण प्रकाश (आयपीएस) आणि महाराष्ट्र पोलिस दलाचे विशेष पोलिस महानिरीक्षक (तटसंरक्षण) यशस्वी यादव यांचा समावेश होता. हा २००वा कार्यक्रम होता. कंपनीने आतापर्यंत देशभरात याचे आयोजन केले असून, त्याद्वारे सुमारे ३० हजार सुरक्षा कर्मचाऱ्यांपर्यंत कंपनी पोहोचली आहे. सहभागी होणाऱ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. जीवनासाठी महत्त्वाचे कौशल्यज्ञान देण्याच्या दृष्टीने या सीएसआर उपक्रमासाठी कंपनीने एनआयएसएमशी भागीदारी केली आहे.

या प्रसंगी महाराष्ट्र पोलिस दलाचे विशेष पोलिस महानिरीक्षक (व्हीआयपी सुरक्षा) कृष्ण प्रकाश म्हणाले, ‘देशातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी २४x७ वाहून घेतलेले हे दल असून, आयसीआयसीआय सिक्युरिटिजने आमच्या या दलाचा विचार करून उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने वित्तीय नियोजनासाठी शिस्तबद्ध दृष्टिकोन किती गरजेचा आहे, याची माहिती देण्यात रस दाखवल्याचे पाहून आनंद झाला.’

विशेष पोलिस महानिरीक्षक (तटसंरक्षण) यादव म्हणाले, ‘आपल्या वित्तीय आणि गुंतवणुकींचे योग्यप्रकारे नियोजन करण्यासाठी अशाप्रकारचे कार्यक्रम आमच्या टीमसाठी सहाय्यभूत ठरणारे आहेत. आयसीआयसीआय सिक्युरिटिजच्या या उपक्रमाचे आम्ही कौतुक करतो. याद्वारे बचत आणि वित्तीय गुंतवणुकींची योग्य माहिती चांगल्याप्रकारे समजून घेऊन आमच्या दलाला आपले स्वत:चे भविष्य सुरक्षित करता येईल.’

आयसीआयसीआय सिक्युरिटिजच्या व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ शिल्पा कुमार म्हणाल्या, ‘देशाच्या आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आपले पोलिस कर्मचारी २४ तास काम करतात. त्यांच्या कामाचे स्वरूप पाहता स्वत:चे आर्थिक व्यवस्थापन करणे आणि वित्तीय गुंतवणुकीच्या नव्या संधींबाबात स्वत:ला अद्ययावत ठेवणे हे त्यांच्या दृष्टीने खूपच कठीणच आहे. आम्ही त्यांची ही गरज जाणून घेतली आणि आपल्या देशी नि:स्वार्थीपणे सेवा करणाऱ्या या लोकांच्या सेवेसाठी समृद्धी अभियान सुरू केले. आपल्या कर्मचाऱ्यांना बचत आणि गुंतवणुकींबाबत शिस्तबद्ध दृष्टिकोन ठेवून नियोजन करता यावे, तसेच आवश्यक ती माहिती आणि ज्ञान मिळावे, यासाठी महाराष्ट्र पोलिस दल सहभागी झाल्याबद्दल आम्हाला आनंद झाला आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link