Next
अनादि मी अनंत मी - ध्वनिनाट्य : भाग सहा
BOI
Tuesday, July 02, 2019 | 10:28 AM
15 0 0
Share this article:

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनकार्याची ओळख नव्या पिढीला होण्याच्या उद्देशाने पुण्यातील ‘रिव्हर्ब प्रॉडक्शन्स’ने ‘अनादि मी अनंत मी’ या नाटकाचे ध्वनिनाट्य रूपांतरण केले आहे. ते ऑडिओ बुकगंगा वेबसाइटवरून मोफत ऐकता येणार आहे. या ध्वनिनाट्याचा सहावा भाग आता प्रसिद्ध झाला असून, त्यात काय ऐकता येईल, त्याबद्दलची ही माहिती...
............
८ जुलै १९१० : सावरकरांवर भारतात खटला भरण्यासाठी त्यांना मारिया बोटीतून लंडनवरून आणत असताना फ्रान्सच्या मार्सेलिस बंदराजवळ त्यांनी एक ऐतिहासिक उडी मारली. अवघा आंतरराष्ट्रीय समुदाय याचा साक्षीदार झाला. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याकडे जगाचे लक्ष जावे, या मुत्सद्दी हेतूने तात्यारावांनी केलेल्या या चित्तथरारक कृतीचे पडसाद इंग्रजांच्या संसदेत आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयात उमटले; मात्र मोबदल्यात सावरकरांना दोन वेळा काळ्या पाण्याची म्हणजेच ५० वर्षांची अभूतपूर्व अशी जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली. त्यांना अंदमान बेटांवर पाठविण्याचा निर्णय झाला. त्याआधी त्यांची रवानगी मुंबईच्या डोंगरी कारागृहात झाली. तिथे त्यांची आणि सौ. यमुनामाई सावरकरांची अनेक वर्षांनी प्रत्यक्ष भेट घडली. काळ्या पाण्याच्या शिक्षेचे जोखड मानगुटीवर असताना आणि कौटुंबिक भविष्याची काहीच कल्पना नसताना, देशाच्या भवितव्याचा आणि स्वातंत्र्याचा विचार सतत मनात ठेवणाऱ्या या अनोख्या सावरकर कुटुंबाला सादर प्रणाम!

लेखक/दिग्दर्शक : माधव खाडिलकर
संगीत : आशा खाडिलकर
निर्मिती : ओंकार खाडिलकर
सहनिर्माते : रिव्हर्ब प्रोडक्शन्स
संगीत संयोजन : आदित्य ओक
ध्वनिसंयोजन : मंदार कमलापूरकर
डिजिटल पार्टनर : स्मृतिगंध
सौजन्य : उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट

(ध्वनिनाट्याचा सहावा भाग ऐकण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. ध्वनिनाट्याच्या पहिल्या पाचही भागांच्या लिंक्स खाली दिल्या आहेत. या ध्वनिनाट्याचा सातवा भाग नऊ जुलै २०१९ रोजी प्रसारित होणार आहे. या नाटकाची आणि ध्वनिनाट्याची निर्मितीकथा वाचण्यासाठी येथे क्लिक करा. )










 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search