Next
‘एसएस कम्युनिकेशन्स’चा दुसरा वर्धापनदिन उत्साहात
प्रेस रिलीज
Tuesday, July 30, 2019 | 04:39 PM
15 0 0
Share this article:


रत्नागिरी : शहरातील मारुती मंदिर येथील एसएस मोबाइल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन्स या अत्याधुनिक दालनाचा दुसरा वर्धापनदिन आज (३० जुलै) उत्साहात साजरा करण्यात आला. 

रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शिरीष सासणे, रत्नागिरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते केक कापण्यात आला. या वेळी ‘एसएस’चे रत्नागिरी शाखा व्यवस्थापक सुशांत वडगावे, मारुती मंदिर शाखेचे फ्रँचायझी पार्टनर आणि शहरातील आठवडा बाजार येथील ‘एसएस’च्या दालनाचे प्रमुख अमोल डोंगरे यांच्यासह कर्मचारी, ग्राहक आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

वर्धापनदिनानिमित्त व्यवस्थापक सुशांत वडगावे यांना शुभेच्छा देताना पोलीस निरीक्षक शिरीष सासणे, वाहतूक शाखेचे अनिल विभूते आणि डीवायएसपी गणेश इंगळे

रत्नागिरीत सुमारे चार वर्षांपूर्वी एसएस मोबाइल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन्सचे पहिले दालन रत्नागिरीकरांच्या सेवेत रुजू झाले. येथे दर्जेदार आणि माफक किंमतीत उपलब्ध असणारी इलेक्ट्रॉनिक उपकरणे, मोबाइल, अॅक्सेसरीज आणि ग्राहकाभिमुख सेवा यांच्या जोरावर अत्यल्प काळात हे दालन ग्राहकांच्या पसंतीस उतरले. त्यानंतर ग्राहकांचा वाढता ओघ लक्षात घेता दोन वर्षांपूर्वी मारुती मंदिर परिसरात या दालनाची दुसरी अत्याधुनिक शाखा सुरू करण्यात आली.

‘एसएस कम्युनिकेशन्स’ या शाखेलाही ग्राहकांचा तितकाच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाली. सणासुदीच्या दिवसांबरोबरच वर्षभर असणाऱ्या विविध ऑफर्स आणि प्रत्येक खरेदीवर हमखास भेटवस्तू हे या दालनाचे वैशिष्ट्य आहे. या शाखेची धुरा व्यवस्थापक सुशांत वडगावे उत्तम पद्धतीने सांभाळत असून, दर्जेदार आणि ग्राहकाभिमुख सेवेला प्राधान्य देण्यावर त्यांचा जोर आहे.

ड्रॉप बॉक्समध्ये जमा झालेली रक्कम आशादीप संस्थेचे दिलीप रेडकर यांच्याकडे सुपूर्द करताना सुशांत वडगावे (उजवीकडून पहिले) आणि अमोल डोंगरे

व्यवसायाबरोबरच या दालनाने सामाजिक बांधिलकीही जपली आहे. या दालनात ठेवण्यात आलेल्या ड्रॉप बॉक्समध्ये वर्षभरात जमलेली सुमारे सहा हजारांची रक्कम सुशांत वडगावे आणि अमोल डोंगरे यांनी रत्नागिरीतील विशेष मुलांसाठी निवासी पद्धतीने चालविल्या जाणाऱ्या आशादीप या संस्थेचे दिलीप रेडकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. गेल्या वर्षीही या संस्थेला ड्रॉप बॉक्समध्ये जमलेली सुमारे अडीच हजारांची रक्कम देण्यात आली होती. 

आज साजरा करण्यात आलेल्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त ‘एसएस मोबाइल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन्स’ येथे ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी करत शुभेच्छांचा वर्षाव केला. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search