Next
‘रुंग्ली रुंग्लीयॉट’ जीए आणि सुनीता देशपांडे यांच्या पत्रांचे अभिवाचन
‘जीएं’च्या ९६व्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन
BOI
Monday, July 08, 2019 | 06:10 PM
15 0 0
Share this article:

पुणे : आपल्या प्रतिभेने मराठी साहित्यातील कथेचे दालन श्रीमंत करणारे कथाकार जी. ए. कुलकर्णी यांच्या ९६व्या जयंतीनिमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषद आणि ‘जीए’ कुटुंबीय यांच्या सयुंक्त विद्यमाने ‘रुंग्ली रुंग्लीयॉट’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

‘रुंग्ली रुंग्लीयॉट’ कार्यक्रमात जी. ए. कुलकर्णी आणि सुनीता देशपांडे यांच्या पत्रांचे अभिवाचन केले जाणार आहे. प्रसिद्ध अभिनेते गिरीश कुलकर्णी आणि प्रसिद्ध लेखिका माधुरी पुरंदरे हे अभिवाचन करणार आहेत. बुधवारी (१० जुलै) सायंकाळी पाच ते आठ या वेळेत टिळक रस्त्यावरील ‘ज्योत्स्ना भोळे नाट्यगृह’ याठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमाचे दिग्दर्शन उमेश कुलकर्णी यांनी केले असून संगीत मंगेश धाकडे यांचे आहे. दृश्यरचना सत्यजित पटवर्धन यांची आहे. ‘अर्भाट फिल्म्स’ने या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले उपस्थित राहणार आहेत. तसेच ‘जीएं’च्या भगिनी नंदा पैठणकर, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार या वेळी उपस्थित राहणार आहेत. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search