Next
‘जेएसपीएम’मध्ये अत्याधुनिक रोबोटिक्स तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण
प्रेस रिलीज
Wednesday, July 17, 2019 | 04:05 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘ताथवडे येथील जेएसपीएम संचालित राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यांत्रिकी अभियांत्रिकी महाविद्यालयातील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागामध्ये असलेल्या सेंटर फॉर एक्सलन्स इन रोबोटिक्स अँड ऑटोमेशन या टाटा ऑटोमेशन लिमिटेड लॅबमध्ये महाविद्यालयातील ३० विद्यार्थ्यांना अत्याधुनिक रोबोटिक्स तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण नुकतेच देण्यात आले,’ अशी माहिती प्रशिक्षण समन्वयक प्रा. अखिल जोशी यांनी दिली.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. जैन यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप नुकतेच करण्यात आले. या प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे माहिती यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. अविनाश बडदे यांनी सांगितले.

जेएसपीएम संस्थापक सचिव डॉ. तानाजी सावंत, प्राचार्य डॉ. आर. के. जैन, उपप्राचार्य प्रा. अविनाश देवस्थळी, प्रा. रवी सावंत व प्रा. सुधीर भिलारे यांनी सर्व प्रशिक्षणार्थींचे अभिनंदन केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search