Next
‘मोबिक्विक’द्वारे क्रेडीट कार्डचे पेमेंट
प्रेस रिलीज
Monday, September 03, 2018 | 04:00 PM
15 0 0
Share this article:

नवी दिल्ली : मोबिक्विक भारतातील सर्वांत मोठ्या डिजिटल वित्तीय सेवा मंचने त्यांच्या अॅपवर कधीही कुठेही क्रेडीट कार्ड बिल पेमेंट सुरू केल्याची घोषणा केली आहे. जारीकर्ता बॅंक कोणती आहे याचा विचार न करता सर्व व्हिसा क्रेडीट कार्ड धारकांसाठी मोबिक्विक हे पेमेंट देऊ करणार आहे. या नव्या ऑफरमुळे मोबिक्विकच्या १०७ दशलक्षपेक्षा जास्त युजरना उत्तम अनुभव मिळणार आहे. भविष्यात इतर क्रेडीट कार्ड ब्रॅंडसाठीही मोबिक्विक या सेवेचा विस्तार करणार आहे.

मोबिक्विककडून येणाऱ्या नवीन ऑफरमुळे भारतातील वाढते क्रेडीट कार्ड मार्केट हस्तगत करण्यासाठी मोबिक्विक सक्षम बनणार आहे. शहरी भारतीय ग्राहकांमध्ये क्रेडीट कार्डचा वापर झपाट्याने वाढत आहे आणि त्यामुळे मोबिक्विकसाठी एक मोठी संधी निर्माण झाली आहे. मोबिक्विक अॅपच्या आधी पुरवलेल्या काही कृतींमध्ये या नव्या सेवेचाही समावेश होणार आहे.

मार्च २०१७ आणि मार्च २०१८ दरम्यान भारतात ७.६८ दशलक्ष क्रेडीट कार्ड वाढले आहेत. क्रेडीट कार्ड उद्योगातील सुत्रांनुसार पुढील चार वर्षांत चार कोटी किंवा ४० दशलक्षपेक्षा जास्त नवे क्रेडीट कार्ड जारी केले जाणार आहेत. आरबीआयच्या माहितीनुसार भारतीय क्रेडीट कार्ड उद्योग हा दरवर्षी २५ टक्क्यांनी वाढत आहे. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात ३३ दशलक्ष क्रेडीट कार्डद्वारे ४५ हजार कोटी खर्च करण्यात आले आहेत.

या घोषणेबाबत बोलताना ‘मोबिक्विक’च्या सह-संस्थापक आणि संचालक उपासना टाकू म्हणाल्या, ‘आम्ही नाविन्य आणि सर्व प्रकारच्या कृतींसाठी युजर डिजिटल पेमेंट पद्धत स्वीकारण्यास सक्षम होण्यासाठी कटीबद्ध आहोत. मागील काही वर्षांत आम्ही विविध उत्पादने आणि सेवांची सुरुवात केली आहे ज्या भारतीय ग्राहकांसाठी विशेष, सोप्या आणि अतिशय समर्पक अशा आहेत. आमच्या कधीही कुठेही क्रेडीट कार्ड पेमेंट सेवा ही आजच्या युजरसाठी अतिशय सोयीची ठरेल जे त्यांचे क्रेडिट कार्ड बिल मोबिक्विक ॲपमार्फत अगदी त्वरित भरू शकतात तेही बँक किंवा क्रेडीट कार्ड कंपनीच्या वेबसाइटला भेट न देता.’

‘क्रेडीट कार्ड पेमेंटमध्ये मोठी संधी आहे आणि आम्ही क्रेडीट कार्ड मार्केटचे तीन ते पाच टक्के मार्केट शेअर स्वतःच्या कक्षेत घेण्याचे ध्येय ठेऊन आहोत ज्याची भव्यता वर्तमान आर्थिक वर्षाच्या समाप्तीपर्यंत बाराशे कोटी ते दोन हजार कोटी इतकी असण्याची शक्यता आहे. आम्ही भागीदार म्हणून व्हिसासह ही श्रेणी सुरू करीत आहोत आणि नजीकच्या काळात अन्य क्रेडीट कार्ड ब्रँडनाही सामील करून घेण्यास प्रयत्नशील असू,’ असे टाकू यांनी सांगितले.

या वेळी व्हिसा इंडियाचे व्यवसाय विकास प्रमुख मुरली नायर म्हणाले, ‘मोबिक्विकसह असलेल्या आमच्या सहसंबंधामुळे व्हिसा ग्राहकांना त्यांच्या मोबाइलवरून डिजिटल व्यवहारांची सुविधा आणि सहजता मिळण्यास मदत होईल. डिजिटल क्षेत्रात झपाट्याने होत असलेल्या वृद्धीमध्ये मोबिक्विक ग्राहकांना कधीही कुठेही त्यांचे व्हिसा क्रेडिट कार्ड बिल भरण्यास सक्षम बनविते.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search