Next
‘एनडीए’च्या १३६व्या तुकडीचा दीक्षान्त सोहळा दिमाखात
BOI
Thursday, May 30, 2019 | 05:30 PM
15 0 0
Share this article:


पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १३६व्या तुकडीचा दीक्षान्त संचलन सोहळा गुरुवारी, तीस मे रोजी हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. 


या दीक्षान्त संचलन सोहळ्यात कॅडेट संदीप कोरंगा याला राष्ट्रपती सुवर्णपदक, कॅडेट दिव्यम द्विवेदी याला राष्ट्रपती रौप्यपदक, तर कॅडेट शिवकुमार सिंग चौहान याला राष्ट्रपती कांस्यपदक प्रदान करण्यात आले. या वेळी सारंग हेलिकॉप्टर्सनी केलेल्या चित्तथरारक कसरतींनी उपस्थितांची मने जिंकली. सुखोई विमानांनी मानवंदना दिली. विद्यार्थ्यांनीही चित्तथरारक साहसी प्रात्यक्षिके सादर केली. 


‘भारतीय उपखंडातील सुरक्षेची आव्हाने वाढत असून, त्याचा मुकाबला करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची गरज आहे,’ असे प्रतिपादन भारतीय हवाईदलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ यांनी केले. 

या वेळी ‘एनडीए’चे कमांडंट एअर मार्शल आय. पी. विपिन, दक्षिण मुख्यालयाचे कमांडंट लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी आणि अधिकारी उपस्थित होते. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search