Next
रेडलाइट परिसरात स्वातंत्र्यदिन साजरा
प्रशांत सिनकर
Thursday, August 16, 2018 | 01:40 PM
15 0 0
Share this article:



ठाणे/भिवंडी :
देहविक्रय करणाऱ्या महिलांना समाजातील चांगल्या गोष्टींचा अनुभव घेण्याचे प्रसंग फारसे येत नाहीत. या पार्श्वभूमीवर, ठाण्यातील संकल्प नॅशनल मेडिकल रिसर्च अँड सोशल ट्रस्ट या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी भिवंडीच्या इंदिरानगर परिसरातील देहविक्रय करणाऱ्या महिलांसमवेत स्वातंत्र्यदिन साजरा केला. या वेळी महिलांनी घरासमोर रांगोळ्या काढल्या होत्या, तसेच पताका लावल्या होत्या. तसेच बच्चेकंपनीने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. 

रेडलाइट परिसरातील महिलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन कायमच वेगळा असतो. त्यामुळे येथील महिला समाजापासून कायमच अलिप्त राहताना दिसतात. या महिलांना समाजात सामावून घेण्यासाठी गेल्या १८ वर्षांपासून संकल्प नॅशनल मेडिकल रिसर्च अँड सोशल ट्रस्ट ही संस्था सक्रिय आहे. या महिलांमधील एड्स आणि गुप्तरोगांचे प्रमाण कमी करण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. या संस्थेतर्फे भिवंडी येथील इंदिरानगरच्या रेडलाइट परिसरात मोठ्या उत्साहाने स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.

या वेळी दंतशल्य चिकित्सक डॉ. उल्हास वाघ यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या महिलांच्या मुलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमही या वेळी सादर केले. कार्यक्रमाला नगरसेवक अजय यादव, शिक्षणतज्ज्ञ जालिस अहमद आझमी, समाजसेवक एस. पी. यादव, अबूसालेम नोमानी, मैनुद्दीन अन्सारी, रत्ना मसाळ, महेंद्र काळे, विद्या देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search