Next
'दिलखुलास'मध्ये रेडकर, जाधव यांची मुलाखत
प्रेस रिलीज
Wednesday, March 13, 2019 | 12:41 PM
15 0 0
Share this article:



मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात ‘घनकचरा व्यवस्थापन’ या विषयावर घनकचरा व्यवस्थापन तज्ज्ञ सीमा रेडकर आणि दयानंद जाधव यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून १३, १४ आणि १५ मार्च २०१९ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

घनकचरा व्यवस्थापन म्हणजे काय, घनकचरा व्यवस्थापनास वर्गीकृत करण्याची सोपी पद्धत, घनकचरा व्यवस्थापनाबाबत सहकारी गृहनिर्माण संस्था तसेच व्यक्तींची जबाबदारी, ‘कंपोस्ट’ प्रकार, ओल्या कचऱ्यापासून तयार करण्यात आलेले खत कोणाला देता येते, कचऱ्याच्या वर्गीकरणासाठी असलेली व्यवस्था, याबाबतची माहिती रेडकर आणि जाधव यांनी ‘दिलखुलास’मधून दिली आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search