Next
अस्सल रेशमी साड्यांसाठी सिल्क मार्क एक्स्पो
१४ मार्चपर्यंत सोनल हॉलमध्ये प्रदर्शन
BOI
Friday, March 01, 2019 | 05:54 PM
15 0 0
Share this story

सिल्क मार्क प्रदर्शनाचे उद्घाटन करताना महापौर मुक्ता टिळक,स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या प्राचार्य डॉ. एम. एम. हुंडेकर, सिल्क मार्कचे सहाय्यक संचालक टी. सिवाकुमार, आलोक कुमार आणि उपसंचालक वाय. श्रीनिवासराव

पुणे : अस्सल रेशमापासून हातमागावर विणलेल्या पारंपरिक साड्यांचा खजिना पुण्यात खुला झाला आहे. जसे सोन्याच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क हे अधिकृत प्रतिक मानले जाते, तसे रेशमी वस्त्रांच्या शुद्धतेची हमी सिल्क मार्क देते. तसेच उत्पादनांचे मूळ ठिकाण कळण्यासाठी त्यावर हँडलूम मार्कचे लेबल लावलेले असते. हे दोन्ही मार्क असणाऱ्या रेशमी साड्या, ड्रेस मटेरियल यांचे प्रदर्शन पुण्यात कर्वेरस्त्यावरील सोनल हॉल येथे सुरू झाले आहे. 

या प्रदर्शनाचे उद्घाटन महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते झाले. या वेळी स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या प्राचार्य डॉ. एम. एम. हुंडेकर, सिल्क मार्क ऑर्गनायझेशन ऑफ इंडियाच्या बंगळुरू विभागाचे सहाय्यक संचालक टी. सिवाकुमार, मुंबई विभागाचे सहाय्यक संचालक अलोक कुमार आणि हैदराबाद विभागाचे उपसंचालक वाय. श्रीनिवासराव उपस्थित होते.

या प्रदर्शनात १४ राज्यांमधील कारागीर सहभागी झाले असून ५२ स्टॉल्स आहेत. पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील कारागीरांनी तयार केलेल्या कटवर्क, कांथा वर्कच्या साड्या, कर्नाटक, आंध्र, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशमधील पारंपरिक पद्धतीच्या साड्या आकर्षक रंगसंगती आणि दर्जेदार विणकाम यामुळे बघताक्षणी मोहून टाकतात. आपण घेतलेली साडी, ड्रेस मटेरियल खरेच रेशमाचे आहे की नाही, याची खात्री करून घेण्यासाठी एक विशेष दालन येथे आहे. तिथे ग्राहक रेशमी वस्त्राची पारख करून घेऊ शकतात. याशिवाय रेशमाचे विविध प्रकार, ते ओळखण्याच्या खुणा आदी माहिती सांगणारेही दालन येथे आहे. 

‘या प्रदर्शनातर्फे सिल्क प्रेमींमध्ये प्युअर सिल्कच्या महत्त्वाबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. यामुळे हातमागावर विणकाम करणाऱ्या कारागिरांना, महिला उद्योजकांना, आणि व्यापाऱ्यांना व्यासपीठ मिळण्यास मदत होण्याबरोबरच भारतीय सिल्कची प्रतिमा वाढण्यास हातभार लागेल,’ असे सिल्क मार्क ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया, मुंबई विभागाचे सहाय्यक संचालक अलोक कुमार यांनी सांगितले. 

‘पुणे ही उत्तम बाजारपेठ असून, ज्या वेळी येथे प्रदर्शन भरते त्या वेळी १५ दिवसांच्या कालावधीत किमान दोन कोटींचा व्यवसाय होतो. उत्तम दर्जेदार साड्यांना पुणेकर ग्राहकांची नेहमीच पसंती मिळते. रेशमी साड्या खरेदीवरच महिला वर्गाचा भर असतो. यंदा पुरुषांसाठी सिल्कचे शर्टदेखील उपलब्ध आहेत. त्यामुळे या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी पुरुष वर्गालाही चांगली संधी आहे,’ असेही अलोककुमार यांनी सांगितले. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link