Next
विदेशी गुंतवणूक वाढल्यास बाजारात तेजीची शक्यता
BOI
Sunday, September 15, 2019 | 03:45 PM
15 0 0
Share this article:


शेअर बाजारात जोपर्यंत विदेशी गुंतवणूकदार उत्सुकता दाखवत नाहीत, तोपर्यंत तिथे तेजी येऊ शकत नाही त्यामुळे सरकारने प्रयत्नशील राहण्याची गरज आहे. सध्या शेअर बाजार संभ्रमित अवस्थेतच आहे. या पार्श्वभूमीवर चांगल्या कंपन्यांच्या शेअर्समध्येच गुंतवणूक करणे योग्य ठरेल.... त्याबद्दल अधिक जाणून घेऊ या ‘समृद्धीची वाट’ या सदरात ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. वसंतराव पटवर्धन यांच्याकडून...
......
शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्स) ३७ हजार ३८४ अंकांवर होता, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ११ हजार ७५ अंकांवर होता.
 
मागच्या लेखातही ज्याची शिफारस केली होती, त्या बजाज फायनान्स कंपनीचा शेअर हळूहळू वाढत असून, आता तो तीन हजार ४३० रुपयांपर्यंत वाढला आहे. प्रत्येक तिमाहीचे विक्री व नफ्याचे आकडे जाहीर झाले की, तो सात ते आठ टक्के वाढून वर्षभरात ३० टक्क्यांचा नफा देतो. गुंतवणुकीसाठी बजाज फिनसर्व्ह आणि बजाज फायनान्स नेहमीच उत्तम असतात. 

त्यानंतर सध्या आकर्षक वाटणारे शेअर्स म्हणजे लार्सन अँड टुब्रो आणि लार्सेन अँड टुब्रो इन्फोटेक हे होत. लार्सन अँड टुब्रो कंपनीला सध्या दोन हजार ५०० कोटी रुपयांची मोठी ऑर्डर मिळाली आहे. ही ऑर्डर महाराष्ट्र व ओडिशा राज्यातून मिळाली आहे. पुढील काही महिन्यात ती नव्या मुंबईत २३ हजार सदनिकांचे बांधकाम करेल. या इमारती १३ ते २० मजल्यांच्या असतील. सरकार अशा सदनिकांच्या खरेदीदारांना अडीच लाख रुपयांचे अनुदान देणार आहे, तर लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक कंपनीने नुकतेच १.९३ लाख शेअर्सचे वितरण केले आहे. मॅसटेक आणि लार्सन अँड टुब्रोने नवीन शेअर दिल्यामुळे या शेअर्सना बाजारात चांगली मागणी येईल. त्यामुळे या दोन्ही शेअर्समधील गुंतवणूक चांगला नफा देऊन जाईल. 

भाग भांडारात वैविध्य आणण्यासाठी ओबेरॉय रिअल्टीचा विचार करावा. ही कंपनी ठाण्यातील पोखरण रस्ता भागात घरे बांधत असून, एक ते दीड कोटी रुपयांत दोन बीएचकेची घरे मिळतील. या परिसरात बरीच हॉस्पिटल्स व महाविद्यालये आहेत. नवीन बांधकामात कंपनीला ४० टक्के नफा होऊ शकतो. त्यासाठी लागणाऱ्या जमिनीचे आग्रहण बऱ्याच प्रमाणात केले आहे. 

गेल्या आठवड्यात केंद्र सरकार भारत पेट्रोलियममधील आपली गुंतवणूक एखाद्या खासगी कंपनीला विकेल, अशी वार्ता पसरल्याने हा शेअरही वाढला आहे. 

वाहन उत्पादक क्षेत्रातील टोयोटा कंपनी अखंड चालणाऱ्या मोटार निर्मितीचा प्रयत्न करणार असल्यामुळे या शेअरलाही चांगली मागणी येईल. 

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांमुळे आता राजकीय घडामोडींना वेग येईल. भाजप व शिवसेना युती कायम रहाण्याबाबत संभ्रम आहे. या निवडणुका ऑक्टोबरच्या मध्यात व्हाव्यात, नवीन सरकार सत्तारूढ व्हावे. त्या वेळी शेअर बाजारात चांगले दिवस येतील.   

- डॉ. वसंत पटवर्धन   
(लेखक शेअर बाजार या विषयातील तज्ज्ञ आणि ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे माजी अध्यक्ष आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध आहेत.)       
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Chandrakant Gumaste About 35 Days ago
डॉक्टर पटवर्धन साहेबांकडून नेहेमीच सर्वोत्कृष्ट मार्गदर्शन मिळते. त्याचा नेहमी लाभ घ्यावा .
0
0

Select Language
Share Link
 
Search