Next
‘काॅर्पोरेट जगत आणि मॅनेजमेंट महाविद्यालये यांच्यात संवादाची गरज’
डॉ. माणिकराव साळुंखे यांचे मत
BOI
Wednesday, September 04, 2019 | 05:51 PM
15 0 0
Share this article:

भारती अभिमत विद्यापीठाच्या ‘आयएमईडी’संस्थेतर्फे आयोजित परिषदेत सहभागी झालेले डॉ. माणिकराव साळुंखे,देवेंद्र देशमुख, डॉ. सचिन वेर्णेकर आदी मान्यवर

पुणे : ‘काॅर्पोरेट जगत आणि मॅनेजमेंट महाविद्यालये यांच्यात सातत्यपूर्ण संवादाची गरज असून, एकमेकांच्या गरजांचा शास्त्रशुद्ध अभ्यास व्हायला हवा’, असे प्रतिपादन भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी केले. भारती अभिमत विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रेप्रिन्यूअरशिप डेव्हलपमेंटने (आयएमईडी) आयोजित केलेल्या ‘इंडस्ट्री-इन्स्टिट्यूट पार्टनरशिप समिट’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

कॉर्पोरेट जगतातील ५० प्रतिनिधी आणि व्यवस्थापनशास्त्र शाखेच्या एक हजार विद्यार्थ्यांनी या परिषदेत भाग घेतला होता. ‘आयएमईडी’चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

डॉ. साळुंखे म्हणाले, ‘काॅर्पोरेट जगत आणि व्यवस्थापनशास्त्र प्रशिक्षण महाविद्यालये यांच्या एकमेकांकडून विविध अपेक्षा असतात, त्याचा अभ्यास व्हायला हवा. भारती विद्यापीठ दूरदृष्टी ठेवून, भविष्याची गरज ओळखून विद्यार्थ्यांची जडणघडण करण्याचा यशस्वी प्रयत्न करत आहे. व्यवस्थापन शास्त्र व इंडस्ट्रीमधील संवादाची दरी भरून काढण्यासाठी प्रयत्न करू. त्यासाठी स्वर्गीय पतंगराव कदम यांची या संदर्भातील धोरणे दिशादर्शक ठरतील.’ 

या वेळी ई-झेस्ट सोल्युशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंद्र देशमुख म्हणाले, ‘ काॅर्पोरेट जगत आणि व्यवस्थापनशास्त्र विद्यार्थी यामध्ये संवाद प्रक्रियेबद्दल ‘आयएमईडी’चा पुढाकार महत्त्वपूर्ण आहे. काॅर्पोरेट जगतात गांभीर्याने काम करणारे आणि मूल्यव्यवस्था मानणारे विद्यार्थी यावेत; तसेच काम सुरू केल्यावर त्यांच्या प्रशिक्षणावर जास्त वेळ घालवावा लागू नये, अशी कार्पोरेट जगाची अपेक्षा असते. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या सांस्कृतिक वातावरणात काम करावे, त्यांच्याकडे तसे संवाद कौशल्य असावे.’

या वेळी ‘व्यवस्थापन विद्यार्थ्यांची उद्योगासंबंधी अपेक्षा’ या विषयावरील चर्चासत्रही झाले; तसेच ‘आयएमईडी’च्या प्लेसमेंट ब्रोशरचे प्रकाशनही करण्यात आले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search