Next
‘भारतीय संगीत हे चिरंतन टिकणारे’
‘तालविश्व’च्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात पंडित स्वपन चौधरींच्या भावना
BOI
Thursday, December 27, 2018 | 11:07 AM
15 0 0
Share this story

पं. स्वपन चौधरी यांना उस्ताद मेहबूब खानसाहेब मिरजकर पुरस्कार प्रदान करताना (डाव्या बाजूने) रिजवान मिरजकर, सुनील मारणे, उस्ताद उस्मान खान, आप्पासाहेब पांढरे, नवाज मिरजकर, केतन बिडवे.

पुणे : ‘मी परदेशात राहात असलो, तरी मला भारतीय संगीताचा नेहमीच आभिमान वाटतो. याच संगीताने मला खूप काही दिले आहे. भारतीय संगीताला खूप मोठी परंपरा आहे. गुरुंनी त्यांच्या शिष्यांना आपली कला हस्तांतरित केल्यानेच आजही भारतीय संगीत क्षेत्रात नवी सक्षम पिढी तयार होत आहे. त्यामुळेच भारतीय संगीत हे चिरंतन काळ टिकणार आहे,’ अशी भावना प्रसिद्ध तबलावादक पं. स्वपन चौधरी यांनी व्यक्त केली.    

उस्ताद मेहबूब खानसाहेब मिरजकर यांच्या ५३ व्या, तर गुरू उस्ताद मोहम्मद हनीफ खान मिरजकर यांच्या चौथ्या स्मृतीप्रित्यर्थ ‘तालविश्व’च्या वतीने आबासाहेब गरवारे महाविद्यालायाच्या सभागृहामध्ये ‘संगीत विरासत’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी प्रख्यात सतारवादक उस्ताद उस्मान खान, ‘तालविश्व’चे नवाझ मिरजकर, रिझवान मिरजकर, ऊर्जा ध्यान केंद्राचे संस्थापक आप्पासाहेब पांढरे, सक्षम फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील मारणे आदी मान्यवर उपस्थित होते.

रईस बाले खान व हाफिज बाले खान यांच्या जुगलबंदीला तबल्यावर साथ करताना नवाज मिरजकर व केतन बिडवे

संगीत क्षेत्रात आपल्या तबलावादनाने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या कलाकारांना ‘तालविश्व’तर्फे गौरविण्यात येते. यावर्षी प्रसिद्ध तबला वादक पं. स्वपन चौधरी यांना ‘उस्ताद मेहबूब खानसाहेब मिरजकर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘तालविश्व’ व टेम्पल ऑफ फाइन आर्ट्स संस्थांच्या ललित कुमार गणेश (सिंगापूर), हेमंत हरिहरन (चेन्नई), शिवाकुमार बालकृष्णन (ऑस्ट्रेलिया) या विद्यार्थ्यांनी केलेल्या तबलावादनाला रसिकांची दिलखुलास दाद दिली. यावेळी रईस बाले खान व हाफिज बाले खान यांच्या सतार जुगलबंदीने उपस्थित रसिकांची मने जिंकली.  या जुगलबंदीस नवाझ मिरजकर व केतन बिडवे यांनी तबल्यावर उत्तम साथ दिली. या कार्यक्रमात शेवटी प्रसिद्ध तबलावादक पंडित स्वपन चौधरी यांनी आपल्या जादुई तबलावादनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांना संगीत मिश्रा यांनी सारंगीवर साथसंगत केली.

तबलावादन करताना पंडित स्वपन चौधरी.

पंडित चौधरी म्हणाले, ‘मला महाराष्ट्राने नेहमीच भरभरून प्रेम दिले आहे. उस्ताद मेहमूद खानसाहेब मिरजकर यांच्यासारख्या विख्यात तबलावादकाच्या नावाने मला मिळालेला पुरस्कार ही माझ्यासाठी भाग्याची बाब आहे.’ 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link