Next
‘टेट्रा पॅक’ मोहिमेत वांद्र्याचे रहिवासी सहभागी
प्रेस रिलीज
Tuesday, May 29, 2018 | 01:49 PM
15 0 0
Share this article:नवी दिल्ली : सध्या महानगरांमध्ये जाणवत असलेली सर्वांत मोठी समस्या म्हणजे कचऱ्याचे व्यवस्थापन. टेट्रा पॅक ही जगातील आघाडीची अन्नप्रक्रिया आणि पॅकेजिंग सोल्युशन कंपनी आरयूआर ग्रीनलाइफच्या मदतीने खोकी जमा करण्याच्या मोहिमेत अधिकाधिक मुंबईकरांना सहभागी करून घेत आहे. वांद्रे येथील एएलएम ११६ पार्क येथे खोके जमा करण्यासाठीचे १७५वे केंद्र सुरू करण्यात आले आहे.

आणखी २५ संकलन केंद्रे सुरू करण्याच्या लक्ष्यासह मुंबईतील केंद्राची एकूण संख्या दोनशेवर नेली जाणार आहे. या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट टेट्रा पॅकच्या प्रत्येक खोक्याचा फेरवापर करून उपयुक्त वस्तू तयार करणे हे आहे. हे साध्य करण्यासाठी ‘कार्टन्स ले आओ, क्लासरूम बनाओ’ या नागरिकांच्या मोहिमेद्वारे मुंबईकर आता शहरातील संकलन केंद्रांमध्ये, यात ४५ रिलायन्स रिटेल व सहकारी भांडार दुकानांचा समावेश आहे, जाऊन त्यांच्याजवळील वापरलेली टेट्रा पॅकची खोकी जमा करू शकतात. या जमा झालेल्या खोक्यांचा वापर करून वंचित समाजघटकांसाठीच्या शाळांमध्ये डेस्क, स्टेशनरी आणि अन्य अनेक उपयुक्त वस्तू तयार केल्या जाणार आहेत. या उपक्रमाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी टेट्रा पॅक डिजिटल आणि प्रत्यक्ष अभियान राबवून मुंबईकरांना प्रेरणा देत आहे.

टेट्रा पॅकने फेरवापरास २०१० मध्ये सुरुवात केली. यात त्यांनी सहकारी भांडार, रिलायन्स फ्रेश आणि आरयूआर ग्रीनलाइफची मदत घेतली. आतापर्यंत २६ लाखांहून अधिक टेट्रा पॅक्सचे संकलन आणि फेरवापर करण्यात आला आहे. २५०हून अधिक शाळांमध्ये डेस्क्सची, तर विविध नागरी सहकारी संस्था व सार्वजनिक स्थळांवर १००हून अधिक बाकांची देणगी देण्यात आली आहे.

नवीन संकलन केंद्राचे उद्घाटन करताना वांद्र्याच्या एच प्रभागाचे नगरसेवक आसिफ झखारिया म्हणाले, ‘कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी कचरा निर्माण करणाऱ्यांपासून त्याचे व्यवस्थापन करणाऱ्या प्रत्येकाने घेतली पाहिजे. ‘कार्टन्स ले आओ, क्लासरूम बनाओ’ या उपक्रमाद्वारे आपण प्रभावी परिवर्तन घडवून आणू शकू, अशी आशा वाटते. खोकी गोळा करण्याच्या या मोहिमेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच हे काम पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी व्यक्तीश: जबाबदारी निभावली पाहिजे. आजूबाजूच्या सर्व सोसायट्यांमधील सदस्यांना त्यांनी वापरलेली खोकी एएलएम ११६ पार्क येथे आणून जमा करण्यासाठी आम्ही प्रोत्साहन देत आहोत. या उपक्रमात अधिकाधिक लोकांना सहभागी करून घेण्याच्या प्रयत्नासाठी आम्ही सीएलएसीबीशी जोडलेल्या संपूर्ण पथकाचे आभार मानतो.  टेट्रा पॅकच्या वापरलेल्या खोक्यांचा फेरवापरातून उपयुक्त वस्तू तयार करण्याची प्रक्रिया बघणे हा खूपच सुंदर अनुभव आहे.’

टेट्रा पॅक दक्षिण आशियाचे संवाद संचालक जयदीप गोखले म्हणाले, ‘दशकभरापूर्वी आम्ही सहकारी भांडार, रिलायन्स फ्रेश आणि आरयूआर ग्रीनलाइफ यांच्या मदतीने फेरवापर कार्यक्रम सुरू केला, तेव्हा मुंबईकरांचा इतका पाठिंबा मिळेल याची कल्पना आम्हाला नव्हती. आज आमचे १७५वे संकलन केंद्र स्थापन करून या वर्षाखेरीपर्यंत मुंबईत २०० केंद्रे स्थापण्याच्या उद्दिष्टाच्या आणखी जवळ पोहोचलो आहोत, याचा आम्हाला अभिमान वाटत आहे. आता आम्हाला गरज आहे ती मुंबईकरांमध्ये या उपक्रमाबद्दल जास्तीत जास्त जागरूकता निर्माण करण्याची. यासाठी आम्ही एक सर्वसमावेश डिजिटल व प्रत्यक्ष मोहीम ‘कार्टन्स ले आओ, क्लासरूम बनाओ’ सुरू केली आहे. यामुळे अधिकाधिक नागरिकांना त्यांचा वाटा उचलण्यासाठी प्रेरणा मिळेल.’

रिलायन्स रिटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी दामोदर माल म्हणतात, ‘कचरा व्यवस्थापनाची समस्या भीषण आहे आणि ही समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक नागरिकाला त्याचा वाटा उचलावा लागेल. शहरभर अस्तित्त्व असलेली एक रिटेल कंपनी म्हणून आम्ही परिवर्तन घडवून आणण्यात शक्य ती सर्व मदत करत राहू आणि आमचे खरेदीदार फेरवापराचा स्वीकार जीवनशैली म्हणून करतील याची काळजी आम्ही घेत राहू.’

‘फेरवापर कार्यक्रमात कसे सहभागी व्हावे आणि कचरा व्यवस्थापनासाठी अधिक चांगल्या पद्धती कशा वापराव्यात यासाठी आमच्याकडे मुंबईभरातून, विशेषत: तरुण विद्यार्थ्यांमधून विचारणा केली जाते. हे खरोखर आम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देते. गेल्या काही वर्षांत हजारो मुंबईकर या मोहिमेचा भाग झाले आहेत आणि पर्यावरण तसेच वंचित घटकांतील मुलांच्या आयुष्यात एक अर्थपूर्ण बदल घडवून आणण्यात वाटा उचलला आहे. संपूर्ण मुंबईने या कार्यक्रमात सहभाग घेतला, तर काय होईल याची मी कल्पना करू शकते,’ असे आरयूआरच्या संस्थापक मोनीशा नरके म्हणतात.

(Please click here to read this news in English.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search