Next
‘माइंड युवर फिटनेस’ सुविधेचे पुण्यात उद्घाटन
प्रेस रिलीज
Friday, March 16, 2018 | 12:00 AM
15 0 0
Share this story

पुणे :  अत्याधुनिक अशा ‘माइंड युवर फिटनेस’ या भारतातील पहिल्याच वेलबीइंग क्लिनीकचे केंद्र आता पुण्यात सुरू झाले आहे. श्वेता  भाटीया आणि अभय केदारी या भारतातील नावाजलेल्या फिटनेस सल्लागारांच्या मार्गदर्शनाखाली ‘माइंड युवर फिटनेस’चे हे केंद्र स्थापन करण्यात आले असून फिटनेस उद्योगक्षेत्रात या दोघांच्या सर्वोत्तम गुणवत्ता व विश्वासार्हतेसाठी ते प्रसिद्ध आहेत. 

या बाबत अधिक  माहिती देताना श्वेता भाटीया म्हणाल्या  ‘शरीर आणि मनाचा समतोल साधताना सर्रास दिसणारे चित्र म्हणजे सारे काही तत्वांमध्ये किंवा विचारांमध्ये दिसते पण कृतीत काहीच नसते. ही दरी भरून काढण्यासाठी ‘माइंड युवर फिटनेस’ सज्ज झाले आहे. या आगळ्यावेगळ्या वेलबीइंग क्लिनिकमध्ये मन, आहार आणि शारीरिक ताकद या तीन महत्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यात येणार असून सतत योग्य मार्गदर्शनाच्या प्रतिक्षेत असलेल्या सर्वसामान्य माणसांपासून एखाद्या निष्णात खेळाडूपर्यंत सर्वांसाठी एकच व्यापक तत्वज्ञान या केंद्रातून तयार करण्यात येणार आहे. एका वैशिष्ट्यपूर्ण दृष्टिकोनातून स्थापन करण्यात आलेल्या ‘माइंड युवर फिटनेस’चा भर संशोधनात्मक, विचारपूर्वक फिटनेस सोल्यूशन्सवर दिला जाणार असून ग्राहकांच्या जीवनशैलीतील सवयींना नजरेसमोर ठेवून ही सोल्यूशन्स तयार करण्यात येणार आहेत. आहार, व्यायाम आणि मानसिक विज्ञान या तीन निकषांनुरूप शारीरिक कामगिरी आणि मानसिक आरोग्य सुधारण्याचे उद्दिष्ट बाळगून कस्टमाईज्ड आरोग्य सेवा पुरवण्याचे या क्लिनीकचे ध्येय आहे.प्रायोगिक तत्त्वावर उत्कृष्ट फिटनेस सोल्यूशन्स ग्राहकांना पुरवण्याच्या दृष्टीने या ब्रँडने फिटनेस क्षेत्रातील दिग्गज मंडळींना यात सहभागी करून घेतले आहे. यात प्रमाणित प्रशिक्षक, वैद्यकीय व क्रीडा आहारतज्ज्ञ, क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ आणि सायकोथेरपिस्ट यांचा समावेश होतो. ग्राहकांना केवळ फिटनेस मार्गदर्शन पुरवणे इतकेच या ब्रँडचे ध्येय नसून, कल्पक तंत्राच्या सहाय्याने जास्तीत जास्त सकारात्मक बदल ग्राहकांच्या आयुष्यात घडवून आणणे आणि त्यासाठी खास वातावरण तयार करणे हे या ब्रँडचे मूळ ध्येय आहे.’
 
‘आमच्या ब्रँडच्या नावातूनच हे स्पष्ट कळते की मानवी कामगिरीमध्ये मन आणि शरीर हे दोन अविभाज्य घटक आहेत. मन व शरीर एकमेकांना साथ देत नसल्यास एखादी व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात उत्तम कामगिरी करूच शकत नाही. मानवी मानसशास्त्र, शरीरशास्त्र आणि शरीर रचना यांतील तत्त्वे एकत्र करून स्वास्थ्य मिळवण्याच्या दृष्टीने निश्चित परिणाम साधता येतात, याबद्दल आम्हाला खात्री वाटते.आजकालच्या तणावपूर्ण वातावरणात जगताना काही आरोग्यपूर्ण सवयींचे पालन करताना ग्राहकांना येणाऱ्या अडचणी आणि बसण्याच्या किंवा स्नायूंच्या असंतुलनामुळे उद्भवणार्या शारीरिक मर्यादा यावर आम्ही प्राथमिक पातळीवर लक्ष केंद्रित करणार आहोत. आहार नियोजनासह आखणीबद्ध व्यायामातून या उपाययोजना सुचवण्यात येणार आहेत.  विविध विभागांसाठी आम्ही अनेक तज्ज्ञ मंडळी नियुक्त केली असून संबंधित विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी प्रशिक्षित तज्ज्ञ आमच्याकडे उपलब्ध आहेत,’ असे ही त्यांनी सांगितले. 
 
‘माइंड युवर फिटनेस’चे संचालक व सहसंस्थापक अभय केदारी म्हणाले, ‘आपल्याकडच्या शहरी भागात राहणाऱ्या लोकांना दिवसेंदिवस फिटनेसचे महत्व अधिकाधिक पटू लागल्याने भारतातील फिटनेस उद्योगक्षेत्र विकसित होत चालले आहे. काही वेळा असे म्हटले जाते की, फिटनेस आणि स्वास्थ्य या गोष्टींकडे पाहण्याचा परिपक्व आणि आधुनिक दृष्टिकोनच आपल्याकडे नाही. फिटनेस हा केवळ आकडेवारीत मोजता येत नाही तर, त्याला दर्जात्मक परिमाणेही जोडली गेली आहेत, हे आपण समजून घ्यायला हवे. या दोन्हीमध्ये संतुलन राखण्याचे काम आमचा ब्रँड करतो. लोकांना त्यांच्या शारीरिक व मानसिक न्यूनगंडांवर मात करण्यासाठी मदत करून त्यांच्याकडून उत्तम कामगिरी करून घेणारा पहिलावहिला ब्रँड म्हणून ‘माइंड युवर फिटनेस’ची ओळख निर्माण करता यावी, हे आमचे ध्येय आहे’.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link