Next
रत्नागिरीत सीएम चषक स्पर्धेचे बक्षीस वितरण
BOI
Wednesday, January 09, 2019 | 03:44 PM
15 0 0
Share this story

सीएम चषमधील कला, क्रीडा जिल्हास्तरीय स्पर्धांचे बक्षीस वितरण करताना आमदार प्रसाद लाड. शेजारी मान्यवर

रत्नागिरी : सीएम चषक कला, क्रीडा स्पर्धेच्या जिल्हास्तरीय स्पर्धांचे बक्षीस वितरण खातू नाट्यमंदिरात आठ जानेवारी २०१९ रोजी करण्यात आले. विविध क्रीडा, कला स्पर्धांमध्ये ३५ चषक व अंतिम विजेत्या, उपविजेत्यांना रोख बक्षीस देऊन गौरवण्यात आले. यातील विजेते खेळाडू मुंबईत राज्य फेरीत सहभागी होणार आहेत. रत्नागिरी भाजपकडून सीएम चषकाचे अत्यंत शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले होते.

विविध स्पर्धांचा सविस्तर निकाल असा : क्रिकेट विजेता पुरुष- युवा गोल्डन स्पोर्टस् (रत्नागिरी), उपविजेता एलआयसीसी (देवरुख), महिला- मुनाफ गर्ल्स (कातळी), बाईंग कॉलेज (लांजा). कबड्डी पुरुष- निळकंठेश्वर (देवरुख), महापुरुष (कशेळी), महिला- जाकादेवी (लांजा), जय भवानी. व्हॉलीबॉल पुरुष- महापुरुष पोलिस (रत्नागिरी), यंग बॉइज (फगरवठार), महिला- जीजेसी गर्ल्स (रत्नागिरी), फाइट क्लब (रत्नागिरी). खो-खो पुरुष- लांजा खो-खो असोसिएशन, केदारलिंग (रिंगणे लांजा), महिला- आर्यन स्पोर्ट्स (रत्नागिरी, ज. ग. पेडणेकर विद्यामंदिर (राजापूर). १०० मीटर धावणे- सागर गुरव, संतोष शेलार, महिला- सायली घवाळी, आरती कांबळे. ४०० मीटर धावणे पुरुष- प्रतीक कांबळे (रत्नागिरी), सिद्धेश भुवड (चिपळूण), महिला- दिव्या भोरे, सायली घवाळी (दोघीही रत्नागिरी).

कुस्ती स्पर्धा (५७ किलो)- गीतेश बेटकर, अमोल बेटकर, ६१ किलो- श्रीराम कांबळे, मिलिंद शेलार, ६५ किलो- केतन शिर्के, ७० किलो- संदीप गुरव, अभिजित जड्यार, ७४ किलो- योगेश हरचेकर, ७९ किलो- ऋषिकेश शिवगण, ८६ किलो- सुयोग कासार, ९२ किलो आनंद तापेकर, अंकुर भुवड, ९७ किलो- प्रथमेश पावसकर. गायन स्पर्धा- निहाल हातखंबकर, कश्मिरा सावंत, नृत्य- आरडीएस ग्रुप, रत्नागिरी युनाइट, सोलो डान्स- आसावरी आखाडे, शुभम रसाळ.

या वेळी आमदार प्रसाद लाड म्हणाले, ‘मी रत्नागिरीचा भूमीपुत्र आहे. मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरीतील आव्हानात्मक स्थिती लक्षात घेऊन विश्‍वासाने मला पक्षकार्याची जबाबदारी दिली आहे. कोट्यवधी रुपयांची कामे मंजूर करून घेतली आहेत. कोकण पदवीधरच्या निवडणुकीतील विजयाने चांगली सुरुवात झाली. सर्व नेते, कार्यकर्त्यांच्या मदतीने पुढील निवडणुकाही जिंकू.’

या प्रसंगी बोलताना जिल्हा प्रवक्ता अ‍ॅड. दीपक पटवर्धन.

जिल्हा प्रवक्ता अ‍ॅड. दीपक पटवर्धन म्हणाले, ‘‘भाजप’ने खेळाडूंसाठी चांगला कार्यक्रम आयोजित केला. जिल्ह्यात ‘भाजप’ची विचारधारा खोल रुजली आहे. ‘भाजप’चा हा वारसा यापुढेही अग्रेसर होईल. मोदी व फडणवीस यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्‍वास आहे. मुख्यमंत्र्यांनी आमदार लाड यांच्याकडे जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे. त्यांच्या खंबीर नेतृत्वाखाली एकसंधपणे काम करत आहोत.’

या वेळी नीता लाड, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, सचिन वहाळकर, दत्ता देसाई, अशोक मयेकर, नाना शिंदे, राजेश सावंत, सतीश शेवडे, नगराध्यक्ष सुरेखा खेराडे, नगराध्यक्ष मृणाल शेट्ये, नगरसेवक मुन्ना चवंडे, विलास पाटणे, प्रशांत डिंगणकर, उमेश कुळकर्णी, बिपीन शिवलकर, राजेश मयेकर, मंदार मयेकर, मुकुंद जोशी, विजय सालीम, शेखर लेले, सुयोग दळी, मिलिंद खानविलकर, अभिनेते अंशुमन विचारे, विशाखा सुभेदार उपस्थित होते. या वेळी अशोक हांडे यांनी सादर केलेल्या ‘दंगलगाणी मंगलगाणी’ या कार्यक्रमाला रसिकांनी दाद दिली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link