Next
कवाड जिल्हा परिषद शाळेत अंधश्रद्धेविषयी जनजागृती
मिलिंद जाधव
Tuesday, October 16, 2018 | 05:02 PM
15 0 0
Share this article:

भिवंडी : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त १५ ऑक्टोबर २०१८ रोजी भिवंडी तालुक्यातील कवाड जिल्हा परिषद शाळेत वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने स्वप्नील भोईर, अक्षय भोईर, करण कुंदेकर या तरुणांनी एकत्र येत या शाळेतील विद्यार्थ्यांना, तसेच शिक्षकांना ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे वाटप केले.

महापुरुषांचा इतिहास शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांपर्यंत व नवीन पिढीपर्यंत पोहचावा यासाठी या तरुणांनी मनोगतातून महापुरुषांबद्दल माहिती देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ग्रामीण भागात अंधश्रद्धेचा मोठ्या प्रमाणावर पगडा आहे. अंधश्रद्धेबद्दल जनजागृती करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ठाणे जिल्हा प्रधान सचिव गणेश शेलार यांनी अंधश्रद्धेविषयी  चमत्काराचे प्रात्यक्षिके दाखवत विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. त्याचबरोबर फटाक्यांमुळे वायू प्रदूषण होत असल्याने, तसेच फटाके शरीराला घातक असल्याने विद्यार्थ्यांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

कॉ. गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकातून विद्यार्थ्यांना इतिहास समजून घेण्यासाठी  मदत होणार आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकरांनी अंधश्रद्धेबाबत समाजात प्रबोधन केले ते या प्रसंगी विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आले. या वेळी शिक्षिका नंदा फुलपगारे, संजना चव्हाण, शीतल सोनवणे, जागृती अंबरे उपस्थित होत्या.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 1 Days ago
Such event should take place , every year , in many places . This is because traditions and habits die hard . Also ecause many people make a living by using these traditions . They do not want changes . They are afraid , they would lose their means of livelihood .
0
0

Select Language
Share Link
 
Search