Next
कारगिल विजयी दिनी मोफत दाखवला जाणार ‘उरी’
BOI
Wednesday, July 24, 2019 | 06:51 PM
15 0 0
Share this article:


अहमदनगर : कारगिल विजयी दिनी म्हणजेच २६ जुलैला नगर जिल्ह्यातील १६ चित्रपटगृहांमध्ये ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ हा चित्रपट मोफत दाखवण्यात येणार आहे. देशातील युवकांमध्ये सैन्याबद्दल आदर, कर्तव्य भावना आणि अभिमान वाढावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. विविध महाविद्यालयांचे प्राचार्य आणि सिनेमागृहांच्या मालकांबरोबर चर्चा केल्यानंतर यासंबंधीचे आदेश जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत. 
  
भारताने पाकिस्तानच्या हद्दीत शिरून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या घटनेवर मागच्या वर्षी आलेला ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ हा चित्रपट खूप गाजला. या चित्रपटामुळे अभिनेता विकी कौशललाही भरपूर प्रसिद्धी मिळाली. भारतीय सैन्य, त्यांनी केलेल्या लढाया, युद्ध अशा घटनांवर याआधीही अनेक चित्रपट आले आहेत. अशा चित्रपटांमुळे देशातील युवकांच्या मनात सैन्याबद्दल आदर निर्माण होऊन देशप्रेमाची भावना जागृत होते, हा उद्देश समोर ठेवून कारगिल दिनी हा चित्रपट मोफत दाखवण्याचे ठरवण्यात आले आहे. 

२६ जुलै हा दिवस ‘कारगिल विजयी दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या वर्षी या दिनाचे औचित्य साधून १८ ते २५ वयोगटातील युवकांना देशभक्तीपर चित्रपट दाखवण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार राज्य शासनाने नगर जिल्हा प्रशासनाला पत्र पाठवले असून त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

दरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, सहायक करमणुक शुल्क अधिकारी एस. एस. पाखरे यांनी जिल्ह्यातील सिनेमागृहांचे मालक व महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक घेऊन सूचना दिल्या. यानुसार जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करून घेण्याबाबत प्रयत्न केले जाणार असून त्याबाबतच्या अंमलबजावणीचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 28 Days ago
This should be observed in taluka places , as well . They should be free -entry events , well publisised .
0
0

Select Language
Share Link
 
Search