Next
भांडारींनी स्वीकारली उपाध्यक्षपदाची सूत्रे
प्रेस रिलीज
Thursday, May 03 | 05:07 PM
15 0 0
Share this story

मुंबई : प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन अधिक चांगल्या रितीने होण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या ‘महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण तथा राज्य पुनर्वसन व पुनर्स्थापना संनियंत्रण समिती’च्या उपाध्यक्षपदाची सूत्रे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी दोन मे रोजी राज्याचे मदत व पुनर्वसन तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत स्वीकारली.

राज्य सरकारने प्रकल्पग्रस्तांच्या प्रभावी पुनर्वनसानासाठी ही व्यवस्था नव्याने निर्माण केली असून, त्याच्या उपाध्यक्षपदी माधव भांडारी यांची नियुक्ती केली आहे व त्यांना कॅबिनेट मंत्री दर्जा देण्यात आला आहे. बुधवारी भांडारी यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. त्यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार अतुल सावे, आमदार मेधा कुलकर्णी व आमदार अनिल गोटे उपस्थित होते.


प्राधिकरण तथा समितीचे पदसिद्ध अध्यक्ष मदत व पुनर्वसन मंत्री पाटील आहेत. समितीचे सदस्य महसूलमंत्री, जलसंपदामंत्री, वित्तमंत्री, ऊर्जामंत्री, उद्योगमंत्री व वनमंत्री आहेत. संनियंत्रण समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मदत व पुनर्वसन विभागाचे अपर मुख्य सचिव काम पाहतील.

कोणत्याही केंद्र अथवा राज्य सरकारी किंवा निमसरकारी किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यंत्रणेने हाती घेतलेल्या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या व्यक्तींच्या पुनर्वसनाची कामे संनियंत्रण समितीमार्फत करण्यात येतील. यासाठी संबंधित प्रकल्प संस्था प्राधिकरण तथा समितीशी करार करेल व आर्थिक तरतूद उपलब्ध करून देईल. पुनर्वसनासाठी धोरणात्मक निर्णय घेणे व नियम तयार करणे याचा अधिकार समितीकडे असेल. पुनर्वसनासाठी समिती खासगी यंत्रणेची मदत घेऊ शकते. पुनर्वसनाचे अंतिम आर्थिक व प्रशासकीय निर्णय घेण्याचे अधिकार समितीला असतील.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link