Next
‘शक्ती-तुरे’ महामुकाबल्याने जिंकली पुणेकरांची मने
प्रेस रिलीज
Monday, October 08 | 02:11 PM
15 0 0
Share this story

‘शक्ती-तुरे’ नृत्यातील कलाकारांचे स्वागत करताना खासदार संजय काकडे आणि सुरज लोखंडे.पुणे : शिवसेना पर्वती विभाग आणि शिवसेना पर्वती मतदारसंघ विभागप्रमुख सुरज लोखंडे यांच्या वतीने अस्सल कोकणच्या परंपरेतील शाहिरी अनुभव असलेल्या ‘शक्ती-तुरे’ महामुकाबल्याचे आयोजन करण्यात आले होते. या जंगी महामुकाबल्याने पुणेकरांची मने जिंकली.

शाहीर पूनम आगरकर आणि शाहीर सुरज हरेकर यांच्या ‘शक्ती-तुरे’ संघात हा महामुकाबला झाला. पारंपरिक स्तवन, गण, गवळण, पद याने कार्यक्रमाला रंगत आणली. या वेळी खासदार संजय काकडे आणि सुरज लोखंडे यांनी लोकनृत्य कलाकारांचा सत्कार केला. या प्रसंगी खडकवासला मतदारसंघाचे शिवसेना विभागप्रमुख नीलेश गिरमे उपस्थित होते.  

‘शक्ती’ म्हणजे आदी माया पार्वतीचे रूप, तर ‘तुरे’ म्हणजे श्रीकृष्णाचे रूप. प्रथम शक्तीवाले यांनी नृत्य सादर केले. त्यानंतर तुरेवाले यांनी आपले सादरीकरण केले. महिला शाहीर चमूचे (शक्तीवाले) नेतृत्व शाहीर पूनम आगरकर यांनी केले. तर पुरुष शाहीर चमूचे नेतृत्व सुरज हरेकर (तुरेवाले) यांनी केले.

सुरज लोखंडे यांनी वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे पुण्यातील कोकणवासीयांचा मेळाच गणेश कला क्रीडा केंद्र येथे भरला होता.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link