Next
‘विश्वस्त या भावनेतून सरकारचे काम’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
प्रेस रिलीज
Saturday, June 01, 2019 | 02:54 PM
15 0 0
Share this article:

नवी मुंबई : ‘सरकार म्हणजे राज्याचे मालक नसून ते जनतेच्या वतीने राज्याचे विश्वस्त असते, हीच भावना कायम ठेवून आमचे सरकार काम करते,’ असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.

नवी मुंबईतील श्री गोवर्धिनी सार्वजनिक सेवा संस्थेतर्फे ‘नवी मुंबई उत्सव २०१९’चे आयोजन ३१ मे २०१९ रोजी केले होते. त्याचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, शिर्डी संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, विधान परिषदेचे आमदार रमेश पाटील, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, विजय चौगुले, आमदार मंदा म्हात्रे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त रामस्वामी आदी मान्यवर उपस्थित होते.


नेरूळच्या कै. गणपतशेट तांडेल मैदानावर हा कार्यकम झाला. या वेळी गोवर्धिनी संस्थेतर्फे दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ११ लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. प्रारंभी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रिमोटद्वारे महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर आमदार म्हात्रे यांच्या कार्य अहवालाचे फडणवीस प्रकाशन झाले. या वेळी फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई खाडी पुलावरून खाडीत पडलेल्या लोकांना वाचविणाऱ्या महेश अशोक सुतार यांचा तसेच सुप्रसिद्ध गायक संगीतकार शंकर महादेवन यांचा सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी बोलताना फडणवीस म्हणाले, ‘कार्य अहवाल म्हणजे निवडून आल्यानंतर लोकांना केलेल्या कामांची दिलेली छापील माहिती, रामभाऊ म्हाळगी यांनी ही परंपरा सुरू केली. ज्या जनतेने आपणाला विश्वासाने निवडून दिले. त्यांच्यासाठी काय केले याची माहिती त्यांना देणे हे आपले कर्तव्य आहे. मंदा म्हात्रे यांनी हा अहवाल प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवावा.’ 


नवी मुंबई महोत्सवाला शुभेच्छा देत या उत्सवाच्या निमित्ताने जनतेचे एकत्रीकरण होणे ही चांगली बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेतला. या वेळी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात शंकर महादेवन, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अभिषेक कांबळे, युक्ता पाटील, सई जोशी आदी कलाकारांनी आपली कला सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक सुबोध भावे यांनी केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search