Next
एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनीचा आयपीओ २५ जुलैपासून खुला
प्रेस रिलीज
Friday, July 20, 2018 | 04:55 PM
15 0 0
Share this article:

एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडच्या आयपीओची  घोषणा करताना एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद बर्वे आणि अध्यक्ष दीपक पारेख
मुंबई : एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडचा प्राथमिक समभाग विक्री योजना (आयपीओ) येत्या २५ जुलैला विक्रीसाठी खुला होत आहे.तो २७ जुलैपर्यंत खुला असेल.

 याद्वारे प्रत्येकी पाच रुपये दर्शनी मूल्य असलेल्या दोन कोटी ५४ लाख ५७ हजार ५५५ समभागांची विक्री करण्यात येणार आहे. हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे ८५ लाख ९२ हजार ९७०पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची आणि स्टँडर्ड लाइफ इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडतर्फे एक कोटी ६८ लाख ६४ हजार ५८५  समभागांची ऑफर फॉर सेलद्वारे रोख पद्धतीने विक्री केली जाणार आहे. 

ऑफरसाठी किंमतपट्टा प्रति इक्विटी शेअर एक हजार ९५ रुपये ते अकराशे रुपये असेल. किमान बोलीचे प्रमाण १३ इक्विटी शेअर्स असून, त्यानंतर १३ इक्विटी शेअर्सच्या पटीत असेल. इक्विटी शेअर्सची नोंदणी बीएसई व एनएसई येथे केली जाणार आहे.

ऑफरसाठी कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, अॅक्सिस कॅपिटल लिमिटेड, डीएसपी मेरिल लिंच लिमिटेड, सिटिग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सीएलएसए इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, एचडीएफसी बँक लिमिटेड, आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, आयआयएफएल होल्डिंग्स लिमिटेड, जेएम फिनान्शिअल लिमिटेड, जे. पी. मॉर्गन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, मॉर्गन स्टॅन्ली इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड व नोमुरा फिनान्शिअल अॅडव्हॉयजरी आणि सिक्युरिटीज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search