Next
कल्पकतेचे दिवस
BOI
Friday, April 13, 2018 | 04:02 PM
15 0 0
Share this story

स्वानुभवांवर आधारित असलेले हे पुस्तक छोट्या उद्योजकांसाठी, नवउद्योजकांसाठी मार्गदर्शक ठरावे. श्रीरंग गोखले यांनी अभियांत्रिकी क्षेत्रात आपली कारकीर्द घडवली. या क्षेत्रातील अपरिचित माहिती पुस्तकातून मिळते. 

आठवणी, तंत्रज्ञान, तत्त्वप्रणालींची उकल उदाहरणेसह आणि भरपूर आकृत्या अशा संमिश्र स्वरूपातील हे पुस्तक आहे. तंत्रज्ञानाची माहितीही सोप्या, सुलभ भाषेत आहे. प्रारंभी त्यांनी पहिली नोकरी, पुणे सोडून कलकत्यात स्थलांतर असा धावता आढावा घेऊन कल्पना आणि त्या कल्पनेची अंमलबजावणी, कल्पकतेचा ध्यास, प्रेरणा आदींवर चर्चा केली आहे.

करा ग्राहकाला केंद्रित, क्वालिटी अर्थात व्हॅल्यू अॅडिशन, अशी ठरवा किंमत, नातेसंबंधांची किंमत अशा लहान लहान प्रकरणांमधून नव्याने या व्यवसायात आलेल्यास मार्गदर्शन मिळेल, असे लेखन केले आहे. कौशल्याचे महत्त्व, उद्योजक होण्यासाठी आवश्यक गोष्टी, अचूकता, ग्राहक समाधान असे विषयही आहेत.

प्रकाशक : पराग गोरे
पाने : २०६
किंमत : २१० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link