Next
अनादि मी अनंत मी - ध्वनिनाट्य : भाग नऊ
BOI
Tuesday, July 23, 2019 | 12:59 PM
15 0 0
Share this article:

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनकार्याची ओळख नव्या पिढीला होण्याच्या उद्देशाने पुण्यातील ‘रिव्हर्ब प्रॉडक्शन्स’ने ‘अनादि मी अनंत मी’ या नाटकाचे ध्वनिनाट्य रूपांतरण केले आहे. ते ऑडिओ बुकगंगा वेबसाइटवरून मोफत ऐकता येणार आहे. या ध्वनिनाट्याचा नववा भाग आता प्रसिद्ध झाला असून, त्यात काय ऐकता येईल, त्याबद्दलची ही माहिती...
............
रत्नागिरीच्या नजरकैदेत असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी, नाट्यलेखनाच्या माध्यमातून विचारप्रवर्तन आणि प्रबोधन करण्यासाठी विशेष प्रयत्न घेतले. जे कार्य अनेक भाषणे देऊन होत नाही, ते कार्य एक नाटक प्रभावीरित्या करू शकते, असा त्यांचा ठाम विश्वास होता.  ‘संगीत उ:शाप’ या नाटकाद्वारे, स्पृश्यास्पृश्यता आणि जातिभेदाचे उच्चाटन करण्यासाठी सर्व समाजातील लोकांच्या अंधश्रद्धा आणि पिढीजात भ्रामक समजुती दूर करून सर्वांना एका कार्यासाठी एकत्र आणणे, हा सावरकरांच्या रत्नागिरीतील कार्याचाच पुढचा अध्याय होता. बुद्धिवादी दूरदर्शीपणाचे दर्शन घडविणारे पुढचे पाऊल म्हणजे सावरकरांचे ‘संगीत संन्यस्त खड्ग’ हे नाटक. एखाद्या राष्ट्राच्या सीमा संरक्षणासाठी आणि जगात प्रबळता टिकवून ठेवण्यासाठी अत्याधुनिक आणि अद्ययावत विज्ञाननिष्ठा आणि शस्त्रसज्जता आवश्यक असून, आत्यंतिक अहिंसा राष्ट्राला त्याच्या शेजाऱ्यांपासून धोक्यात आणू शकते हे पटवून देण्यासाठी भगवान बुद्ध आणि त्यांचे सेनापती विक्रमसिंघ यांच्यातील विचारसंघर्षावर बेतलेले हे नाटक क्रांतिकारीच ठरले. सावरकरांच्या विज्ञानवादी आणि आधुनिक विचारांना आत्मसात करण्याच्या दृष्टिकोनाचे दर्शन ‘संगीत संन्यस्त खड्ग’ या नाटकातून घडते. ‘शतजन्म शोधिताना, शतआर्ती व्यर्थ झाल्या | शतसूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या’ यांसारख्या भावोत्कट गीतांच्या उत्तमोत्तम रचना या नाटकाच्या केंद्रबिंदू ठरल्या. 

लेखक/दिग्दर्शक : माधव खाडिलकर
संगीत : आशा खाडिलकर
निर्मिती : ओंकार खाडिलकर
सहनिर्माते : रिव्हर्ब प्रोडक्शन्स
संगीत संयोजन : आदित्य ओक
ध्वनिसंयोजन : मंदार कमलापूरकर
डिजिटल पार्टनर : स्मृतिगंध
सौजन्य : उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट

(ध्वनिनाट्याचा नववा भाग ऐकण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. ध्वनिनाट्याच्या पहिल्या आठही भागांच्या लिंक्सही खाली दिल्या आहेत. या ध्वनिनाट्याचा दहावा भाग ३० जुलै २०१९ रोजी प्रसारित होणार आहे. या नाटकाची आणि ध्वनिनाट्याची निर्मितीकथा वाचण्यासाठी येथे क्लिक करा. )














 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search