Next
मुख्याध्यापकांकडून केंद्रप्रमुखांना लॅपटॉपचे ‘सरप्राइज गिफ्ट’
मिलिंद जाधव
Wednesday, August 22 | 06:07 PM
15 0 0
Share this story



भिवंडी :
ठाण्याच्या भिवंडी तालुक्यातील दाभाड शैक्षणिक केंद्रातील सर्व मुख्याध्यापकांनी एकत्र येऊन दाभाड येथील केंद्रशाळेचे केंद्रप्रमुख श्यामसुंदर दोंदे यांना लॅपटॉपची भेट दिली. दाभाड केंद्राअंतर्गत येणाऱ्या बारा शाळांतील सर्व मुख्याध्यापकांनी एकत्र येऊन वर्गणी काढून हे ‘सरप्राइज गिफ्ट’ दिले. केंद्रांतर्गत असलेल्या शाळांच्या कामांचा समन्वय करणे सोपे व्हावे, यासाठी केंद्रप्रमुखांना ही भेट देऊन त्यांना आनंदाचा धक्का दिला.

अस्नोली पाडा, चाणे कॉलनी, बासे, दाभाड, शेडगाव, खंबाळा, कुशिवली, पाली, किरवली, चाणे, कोटाची जांभिवली, महाप या गावांतील शाळांच्या मुख्याध्यापकांनी वर्गणी काढून लॅपटॉप भेट दिला. अश्विनी गावित, यशवंत म्हस्कर, भाई पाटील, राजेंद्र भोईर, दिनेश परदेशी, कविता भोये, मनीषा धनगर, स्वाती तळकर, संजय गोसावी, सुधीर पाटील, गजानन कोकाटे, अशोक ठाणगे अशी या मुख्याध्यापकांची नावे आहेत. 

आपले केंद्र कोणत्याही कामाच्या बाबतीत मागे राहू नये, हा या भेटीमागचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. ‘लॅपटॉपसारखे माध्यम असेल, तर सर्व कामे सुरळीत पार पाडली जातात आणि व कामे करणे सोपे जाते. ही अमूल्य भेट देऊन मला सर्वांनी उपकृत केले आहे,’ अशा भावना श्यामसुंदर दोंदे यांनी व्यक्त केल्या आणि सर्व मुख्याध्यापकांचे आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Shamsundar About 86 Days ago
छान
0
0

Select Language
Share Link