Next
‘‘घृष्णेश्वरा’च्या वास्तू शिल्प वैभवात भर पडणारे काम करा’
प्रेस रिलीज
Thursday, June 06, 2019 | 05:22 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : ‘बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वेरूळ घृष्णेश्वर मंदिर विकास आराखड्यातील कामांनी या मंदिराच्या वास्तू शिल्पात अधिक भर पडेल अशा पद्धतीने ती करण्यात यावीत,’ अशा सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज (सहा जून २०१९) दिले.

सह्याद्री अतिथीगृहात त्यांनी आज घृष्णेश्वर विकास आराखड्यातील कामांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मुनगंटीवार म्हणाले, ‘श्री क्षेत्र घृष्णेश्वर मंदिर परिसर विकासासाठी ११२.४१ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. वेरूळ लेणी आणि ज्योतिर्लिंग मंदिराला वर्षभर अनेक भाविक आणि पर्यटक भेट देतात. हे लक्षात घेऊन विकास आराखडा निश्चित करण्यात आला आहे. निधीची उपलब्धता करून देण्यात आली आहे. त्यामुळे करण्यात येणारी कामे स्थानिकांना सोबत घेऊन वेगाने आणि नाविन्यपूर्ण रीतीने पूर्ण केली जावीत.’ 

आराखड्यात स्वागतद्वार, वाहनतळ, ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन कम्पाउंड वॉल, बेल-फुलांची दुकाने, डिजिटल लॉकर रूम, दर्शन रांगेत ‘ओम नमः शिवाय’चा जप ऐकू येण्याची व्यवस्था, होम कुंड, त्रिशुळ डमरूच्या प्रतिकृती,  सुंदर दीपमाळ, भव्य नंदी, बारा ज्योतिर्लिंगाच्या प्रतिकृती, दशक्रिया विधी घाट, बेल-फुलांपासून खत निर्मितीचा प्रकल्प अशी विविध कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. यातील जी कामे पूर्णत्वाला आली आहेत ती श्रावण महिन्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना या वेळी अर्थमंत्र्यांनी दिल्या.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search