Next
शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेच्या पहिल्याच दिवशी सत्कार
BOI
Monday, June 18 | 11:18 AM
15 0 0
Share this story

सोलापूर : रोपळे (ता. पंढरपूर) येथील श्री शिवाजीभाऊ बाबा पाटील विद्यालयातील शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेच्या पहिल्याच दिवशी सत्कार करण्यात आला. अचानक झालेल्या या सत्काराने शिक्षक व विद्यार्थी भारावून गेले. या कार्यक्रमाचे आयोजन रोपळे विकास प्रतिष्ठानने केले होते.

इयत्ता दहावीच्या परीक्षेत या वेळी प्रथमच नऊ विद्यार्थी ९० टक्क्यांच्या वर गुण मिळवून उत्तीर्ण झाले.  ७५ टक्क्यांच्या वर गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा ५०वर गेली. गणित व विज्ञान या विषयांचा निकाल १०० टक्के लागला. त्यामुळे या विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एम. बागल व त्यांच्या सर्व शिक्षक सहकाऱ्यांचा पुष्पहार व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. ९० टक्क्यांच्या वर गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचाही पुस्तक व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. एम. पुजारी यांनी केले. आभार मुख्याध्यापक श्री. बागल यांनी मानले.

या वेळी सरपंच दिनकर कदम, रोपळे विकास प्रतिष्ठानचे संचालक अर्जुन भोसले, मोहन काळे, रयत शिक्षण संस्थेच्या सर्वसाधारण कार्यकारिणीचे सदस्य बाळासाहेब पाटील, विठ्ठल कारखान्याचे माजी संचालक विलास भोसले, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य नागनाथ माळी, नारायण गायकवाड, विलास (ल.) भोसले, विनायक निंबाळकर, हनुमंत भोसले, पोपटलाल शहा, बाळासाहेब भोसले, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष जनक भोसले, रावसाहेब कदम, बाळासाहेब आदमिले, विष्णू गांढुळे आदी मान्यवर उपस्थित होते. 

(या शाळेने विद्यार्थ्यांना मराठीची गोडी लावण्यासाठी राबविलेल्या विशेष उपक्रमाची बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा. या शाळेसंदर्भातील अन्य बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link