Next
‘डीवायपीआयएमएस’मध्ये ‘फ्युजन २०१८’ उत्साहात
प्रेस रिलीज
Monday, March 19 | 02:49 PM
15 0 0
Share this story

पुणे : डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (डीवायपीआयएमएस) मध्ये ‘फ्युजन २०१८ : द बाहुबली वे’ हा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात झाला. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी दोघांनीही पारंपरिक वेशभूषा परिधान करून महिला दिन व पारंपरिक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. या वेळी महिला उद्योजक लीना खांडेकर, श्वेता कुलकर्णी, अर्चना जोशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गर्शन केले.

या महोत्सवात विविध आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांचे आयोजन केले होते. त्यामध्ये बिझनेस क्विझ, केस स्टडीज काँपिटीशन, ट्रेजर हंट अशा बौद्धिक क्षमता वाढविणाऱ्या स्पर्धांचा समावेश होता. व्यवस्थापन विषयावर पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा घेण्यात आली. यात डी. वाय. पाटील फाईन आर्ट्सच्या प्राचार्यांचे, विद्यार्थ्यांचे आणि कार्पोरेट क्षेत्रातील मान्यवरांचे सहकार्य लाभले.  

आंतरराष्ट्रीय महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये ऍडमॅड शो, सिंगिंग, डान्सिंग, फेस पेंटिंग्स् तसेच छोटे उद्योजक बाजाराचे देखील आयोजन केले होते. शेवटच्या दिवशी सांस्कृतिक संध्याचे आयोजित केली होती. यात प्रामुख्याने विविध नृत्य संगीत, सिंगिंग व फॅशन शोसारख्या मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा समावेश होता.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे संचालक डॉ. जयसिंग पाटील यांनी भूषवले. महाविद्यालयाचे संचालक प्रा. डॉ. आशुतोष मिसाळ यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पलक शर्मा व सुरभी सिंग यांनी केले. प्रा. शिवाजी माने व इतर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link