Next
ठाण्यातील यू थ्री मान्सून वर्षा मॅरेथॉन स्पर्धेला उत्तम प्रतिसाद
BOI
Wednesday, August 14, 2019 | 09:10 PM
15 0 0
Share this article:



ठाणे :
ठाण्यातील बाळकुम येथे नुकतेच यू थ्री मान्सून वर्षा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे यंदाचे हे दुसरे वर्ष होते. बाळकुम ते ढोकाळी ते कोलशेत या मार्गावर ही स्पर्धा पार पडली. 

युनायटेड थ्री स्पोर्टस् क्लबच्या माध्यमातून ठाणे अॅथलेटिक्स असोसिएशन व महाराष्ट्र अॅथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने झालेल्या या स्पर्धेला रोटरी क्लब ऑफ ठाणे अरबेनिया आणि लायन्स क्लब ठाणे यांचे सहकार्य लाभले. या वेळी ज्येष्ठ मराठी सिनेकलाकारही धावपटूंचा उत्साह वाढवण्यासाठी उपस्थित होते. यू थ्री स्पोर्टस् क्लबने ‘ग्रीन सिटी क्लीन सिटी’ ही संकल्पना घेऊन या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेतून गरिब मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहकार्यदेखील करण्यात आले. या वेळी आमदार रवींद्र फाटक, ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर, नगरसेवक संजय भोईर, नगरसेवक भूषण भोईर उपस्थित होते. 

तीन गटात ही मॅरेथॉन पार पडली. पहिला गट १० किलोमीटर, दुसरा गट पाच किलोमीटर आणि तिसरा गट तीन किलोमीटरचा होता. त्याचप्रमाणे विशेष मुलांसाठी एक किलोमीटर अंतराची मॅरेथॉन घेण्यात आली. या मॅरेथॉनमध्ये हजारो स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. ठाणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. या वेळी सांगली, कोल्हापूर आणि सातारा येथील पूरग्रस्तांसाठी आमदार रवी फाटक यांच्याकडे एक लाख एक हजार ११ रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सुपूर्द करण्यात आला. 

स्पर्धेचा निकाल :
तीन किलोमीटर (महिला) : प्रथम - गायत्री शिंदे, द्वितीय - निकिता माने, तृतीय - कृतिका यादव
तीन किलोमीटर (मुले) : प्रथम - शैलेश बेंद्रे, द्वितीय - विशाल जाधव, तृतीय - सुशांत कुमार 
१० किलोमीटर (मुले) : प्रथम - युवराज थेटले, द्वितीय - दिनेश म्हात्रे, तृतीय - सागर म्हसकर 
१० किलोमीटर (मुली) : प्रथम - श्रीदेवी मेहेत्रे, द्वितीय - अक्षया जाड्यार, तृतीय - जयश्री भुयाद्रे 
पुरुष : प्रथम - तुषार, द्वितीय - दिवाकर शर्मा, तृतीय - नंदकिशोर सिंग
महिला : प्रथम - वैशाली गर्गे, द्वितीय - लक्ष्मी झा, तृतीय - नेहा मुळगुंद
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search