Next
‘जीवनसंघर्ष’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
मिलिंद जाधव
Wednesday, January 02, 2019 | 02:45 PM
15 0 0
Share this storyकल्याण : येथील कवी कट्टा ग्रुप आणि शारदा प्रकाशन यांच्या वतीने ‘जीवनसंघर्ष’ या कविता संग्रहाचे प्रकाशन शहरातील राजभर नगर येथील धम्मदीप बुद्धविहार येथे उत्साहात झाले. या प्रसंगी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने, तर काहींना हिराबाई हरीचंद जगदेव स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

महामानवांना अभिवादन करून कवी दीप यांनी प्रबोधनात्मक गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात केली. या वेळी साहित्यिक प्रा. दामोदर मोरे, साहित्यिक प्रा. शुक्राचार्य गायकवाड, साहित्यिक प्रा. डॉ. शहाजी कांबळे, सामाजिक कार्यकर्ते सीताराम गायकवाड, नाना नेटावटे, साहित्यिक डी. एल. कांबळे, संजय थोरात, चित्रकार सतीश खोत, कवी गायक मास्टर राजरत्न राजगुरू, साहित्यिक श्रीकृष्ण टोबरे, पत्रकार संतोष चव्हाण, कवी विलास बसवंत, साहित्यिक विजयकुमार भोईर, साहित्यिक जगदेव भटू, पी. बी. भडांगे यांसह सामाजिक कार्यकर्ते, कवी, साहित्यिक उपस्थित होते.या वेळी बोलताना प्रा. मोरे म्हणाले, ‘कोणताही शब्द काढता येत नाही आणि दुसरा शब्द टाकता येत नाही तीच खरी कविता व कविता हवीहवीशी वाटयाला नको तिला देखील तुम्ही हवेहवेसे वाटायला हवेत, अनुभवाची गर्भधारणा झाल्याशिवाय आणि अनुभूतीच्या कळा आल्याशिवाय कवितेचा जन्म होत नसतो.’

विजयकुमार गवई म्हणाले, ‘भारतीय संविधान माझी माता असेल, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आमचे पिता आहेत. समाज सुधारणेसाठी आपण स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे आणि ती सुरुवात ‘जीवनसंघर्ष’मधून नवनाथ रणखांबे यांनी केली आहे.’  डॉ. शहाजी कांबळे, शुक्राचार्य गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी उपस्थित कवींनी स्वरचित कविता सादर केल्या. साहित्यिक प्रा. मोरे, प्रा. गायकवाड, प्रा. डॉ. कांबळे, सामाजिक कार्यकर्ते गायकवाड, नेटावटे, साहित्यिक कांबळे, थोरात, खोत, राजगुरू, साहित्यिक टोबरे, कवी गावंडे, पत्रकार चव्हाण, कवी विलास बसवंत, साहित्यिक भोईर, भटू, पी. बी. भडांगे, कांतीलाल भडांगे, अॅड. सोनावणे, कवी घनगाव, प्रतीक्षा थोरात, कवी मिलिंद जाधव यांना कवी कट्टा ग्रुपतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

दर वर्षी साहित्य, कला, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करणार असल्याचे कवी कट्टा ग्रुपचे अध्यक्ष नवनाथ रणखांबे यांनी या प्रसंगी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशा रणखांबे यांनी केले. कवी मिलिंद जाधव यांनी सूत्रसंचालन केले. विजयकुमार भोईर आणि कवी अनिल शिंदे यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link