Next
कवी यशवंत, डॉ. यु. म. पठाण
BOI
Friday, March 09 | 03:45 AM
15 0 0
Share this story

‘आई म्हणोनी कोणी आईस हाक मारी; ती हाक येई कानी, मज होय शोककारी’ ही हृदयस्पर्शी कविता लिहिणारे कवी यशवंत आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक म्हणून प्रसिद्ध असणारे डॉ. यु. म. पठाण यांचा नऊ मार्च हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी...
....... 
यशवंत दिनकर पेंढारकर

नऊ मार्च १८९९ रोजी साताऱ्यात जन्मलेले यशवंत दिनकर पेंढारकर हे रविकिरण मंडळाच्या संस्थापक कवींपैकी एक महत्त्वाचे कवी म्हणून प्रसिद्ध होते. १९२०-३०च्या दशकांमध्ये रविकिरण मंडळाने कविता महाराष्ट्राच्या गावागावांत पोहोचवल्या. 

१९५० सालच्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 

१९४० साली बडोद्याच्या महाराजांनी कवी यशवंत यांना ‘राजकवी’ या पदवीनं सन्मानित केलं होतं. 

भारत सरकारने त्यांना १९६९ साली पद्मविभूषण किताब दिला होता. 

त्यांच्या ‘आई म्हणोनी कोणी’ या कवितेतील या काही ओळी –

‘आई!’ म्हणोनी कोणी। आईस हाक मारी
ती हाक येई कानी। मज होय शोककारी
नोहेच हाक माते। मारी कुणी कुठारी
आई कुणा म्हणू मी?। आई घरी न दारी!
ही न्यूनता सुखाची। चित्ता सदा विदारी
स्वामी तिन्ही जगाचा। आईविना भिकारी.
चारा मुखी पिलांच्या। चिमणी हळूच देई
गोठ्यात वासरांना। या चाटतात गाई
वात्सल्य हे पशूंचे। मी रोज रोज पाही
पाहून अंतरात्मा। व्याकूळ मात्र होई!
वात्सल्य माउलीचे। आम्हा जगात नाही
दुर्भाग्य याविना का?। आम्हास नाही आई
शाळेतुनी घराला। येता धरील पोटी
काढून ठेवलेला। घालील घास ओठी
उष्ट्या तशा मुखाच्या। धावेल चुंबना ती
कोणी तुझ्याविना गे। का ह्या करील गोष्टी ?
तुझ्याविना न कोणी। लावील सांजवाती
सांगेल ना म्हणाया। आम्हा ‘शुभं करोति’....

मित्रप्रेम रहस्य, यशवंत, वीणाझंकार, बंदिशाळा, पाणपोई, वाकळ, छत्रपती शिवराय, कातिणीचे घर, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

२६ नोव्हेंबर १९८५ रोजी त्यांचं निधन झालं.

(कवी यशवंत यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
..........

युसुफखान महंमदखान पठाण

नऊ मार्च १९३० रोजी जन्मलेले डॉ. यु. म. पठाण हे संतसाहित्याचे अभ्यासक म्हणून प्रसिद्ध असणारे साहित्यिक. 

बखर वाङ्‌मय, महानुभाव वाङ्‌मय, सुफी वाङ्‌मय अशा विविध साहित्याचा त्यांनी अभ्यास आणि संशोधन करून त्या संदर्भात लेखन केलं आहे.  त्यांनी फारसी भाषेसंदर्भात विशेष अभ्यास करून ‘मराठी बखरीतील फार्सीचे स्वरूप’ हा ग्रंथ लिहिला आहे. 

भाऊसाहेबांची बखर, जडणघडण शब्दांची, ज्यांनी मला घडविलं, लेक सावित्रीची, महानुभाव साहित्य : शोध आणि समीक्षा, महाराष्ट्राची संतपरंपरा, मराठवाडी, परिवर्तनाच्या वाटेवर मुस्लिम समाज, संतसाहित्य : शोध आणि बोध, संतसाहित्य नवचिंतन, संतवाणी १०१ संतश्रेष्ठ, अजून आठवतं..., गंधवार्ता, मध्ययुगीन संत साहित्य : काही आयाम, मूल्यसंस्कार, स्मरणगाथा, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

(डॉ. यु. म. पठाण यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा. दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link